ETV Bharat / state

पांडुरंगाच्या महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचा वारकरी म्हणून विणेकरी दाम्पत्याला संधी

विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेचा मान मानाचा वारकरी म्हणून विणेकरी यांना उपस्थित राहण्याचा मान मिळणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

pandharpur
pandharpur
author img

By

Published : Jul 3, 2021, 9:51 PM IST

पंढरपूर - पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी एकादशी सोहळा साध्या पद्धतीने होणार आहे. येत्या 20 जुलैला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा पार पडणार आहे. मात्र त्यांच्यासोबत महापूजेचा मान मानाचा वारकरी म्हणून विणेकरी यांना उपस्थित राहण्याचा मान मिळणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे..

विठ्ठल मंदिरातील चार पैकी एका विणेकऱ्याला मान मिळणार -

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोरोना पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे आषाढी एकादशी सोहळा होऊ शकला नाही. त्यामुळे आषाढी यात्रा ही भरू शकली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत मानाचा वारकरी म्हणून विणेकाऱ्यांना संधी दिली जाते. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेची सेवा विणेकरी देत असतात. दिवस-रात्र विणेची सेवा देण्यासाठी चार विणेकरी विठ्ठलाच्या सेवेत असतात. यापैकी एकाला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान दिला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत वारकरी दाम्पत्याला महापूजेचा मान देण्याची परंपरा -

प्रत्येक आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत मानाचा वारकरी म्हणून पूजेला उपस्थित राहण्याची परंपरा आहे. या मानाचा वारकरी हा आषाढी एकादशीच्या दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांमधून वारकरी दाम्पत्यांची निवड केली जात असते. मात्र दोन वर्षाला आषाढी यात्रा होऊ न शकल्यामुळे भाविकांना ही बंदी आहे. त्यामुळे विन्याची सेवा देणाऱ्या विणेकऱ्यांमधूनच मानाच्या वारकऱ्यांची निवड केली जाते.

चिठ्ठ्या टाकून निवड केली जाणार -

गेल्या दोन वर्षांपासून ही परंपरा बंद आहे. त्याऐवजी विठ्ठल मंदिरातील विण्याची सेवा करणारे किंवा विणा घेऊन उभे असणाऱ्या सेवेकऱ्यांमधून मानाचा वारकरी निवडला जातो. यंदाही मानाचा वारकरी निवडण्याची प्रक्रिया मंदिर समितीकडून सुरु झाली आहे. यानुसार लवकरच त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून ही निवड केली जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.