ETV Bharat / state

Cannabis Seized On Bijapur Highway : विजापूर महामार्गावर सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त, एकजणाला घेतले ताब्यात - cannabis seized on Bijapur highway one arrested

विजापूर नाका पोलिसांनी सोलापूर विजापूर महामार्गावर सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. सोलापूर शहर पोलिसांनी ही कारवाई केल्याने (Cannabis Seized On Bijapur Highway) गांजा विकणाऱ्या तस्करीचे धाबे दणाणले आहेत. विजापूर नाका पोलिसांच्या गस्ती पथकाने संशयास्पद जाणाऱ्या इनोव्हा कारला अडवून झडती घेतली (Bijapur Police Station) असता त्यामध्ये गांजा आढळून आला आहे. या कारवाईमध्ये 4 संशयित आरोपी पळून गेले आहेत. मात्र, सोलापूर ग्रामीण भागातील एका संशयित आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

जप्त करण्यात आलेला गांजा
जप्त करण्यात आलेला गांजा
author img

By

Published : Dec 20, 2021, 10:36 AM IST

सोलापूर - सोलापूरमध्ये विजापूर नाका पोलिसांनी सोलापूर विजापूर महामार्गावर सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. सोलापूर शहर पोलिसांनी ही कारवाई केल्याने गांजा विकणाऱ्या तस्करीचे धाबे दणाणले आहेत. विजापूर नाका पोलिसांच्या गस्ती पथकाने संशयास्पद जाणाऱ्या इनोव्हा कारला अडवून झडती घेतली असता त्यामध्ये गांजा (Cannabis Bijapur Highway) आढळून आला आहे. या कारवाईमध्ये 4 संशयित आरोपी पळून गेले आहेत. (Solapur Bijapur Highway Police) मात्र, सोलापूर ग्रामीण भागातील एका संशयित आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सव्वा कोटींचा गांजा आणि इनोव्हा कार असा एकूण 1 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गस्त करत असलेल्या अवघ्या तीन पोलिसांनी मोठा गांजा साठा जप्त केल्याने या पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलीस आयुक्त हरीश बैजल हे या तिन्ही पोलिसांना रिवार्ड देण्याची देखील घोषणा केली आहे.

प्रतिक्रिया देता पोलीस अधिकारी

सोलापूर विजापूर महामार्गावर सिनेस्टाईल कारवाई-

सोलापूर विजापूर महामार्गावर सैफुल पोलीस चौकीचे पीएसआय सुरज मुलाणी, अमृत सुरवसे, प्रकाश राठोड हे रात्री गस्त करत होते. त्यावेळी सोलापूर शहरातून दोन संशयास्पद कार भरधाव वेगाने जात होत्या. पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांना याबाबत संशय आला. त्यांनी दोन्ही कार अडवण्याचा प्रयत्न केला. पण टवेरा, इनोव्हा कार थांबल्या नाहीत. तिन्ही पोलिसांनी दोन्ही कारचा पाठलाग सुरू केला. विजापूर रोडवरील इंचगिरी मठाजवळ इनोव्हा कारला पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र, तवेरा कार निसटली.

त्यामध्ये पांढऱ्या रंगाची पोती होती

इनोव्हा कार क्रमांक (एम.एच 04 डी जे 3715)यामध्ये दोघे बसले होते. पोलिसांना पाहून इनोव्हा मधील एक संशयित इसम रात्रीच्या अंधारात पळून गेला. तर एक संशयित इसम सुखदेव यशवंत राठोड(वय 27,रा, तेरा मैल, दक्षिण सोलापूर)याला पोलिसांनी पकडले आणि कारची झडती घेतली. त्यामध्ये पांढऱ्या रंगाची पोती होती. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा असल्याचं समजल.पेट्रोलिंगच्या पोलिसांनी ताबडतोब इनोव्हा कार गांजा सहित आणि संशयित इसमा सहित विजापूर नाका पोलीस ठाण्यात आणली आणि तपास सुरू केला. सिनेस्टाईल पाठलाग करून 623 किलो गांजा, एक इनोव्हा कार आणि एक संशयित इसम ताब्यात घेतला. मात्र एक ट्वेरा आणि चार संशयित इसम पळून गेले.

हैदराबाद येथून गांजा आणला असल्याची प्राथमिक माहिती समोर-

सव्वा कोटींचा गांजा हैदराबाद येथून सोलापूर शहरात आणला होता. त्याची तस्करी करून पुढे हा कर्नाटक येथे घेऊन जात होते. मात्र, पोलिसांनी हा गांजा सोलापुरातच पकडला. पण गांजा हैदराबाद येथून नेमका कुठून आणला होता आणि कुणाकडे घेऊन जात होते. याचा मूळ मालक कोण आहे, आणि ग्राहक कोण आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी डीसीपी डॉ. वैशाली कडुकर यांनी दिली आहे.

सरकारी किमतीनुसार सव्वा कोटींचा गांजा-

पोलिसांनी सरकारी किंमतीनुसार गांजाची किंमत 1 कोटी 24 लाख ग्राह्य धरली आहे. प्रतिकिलो 15 हजार रुपये अशी किंमत लावली आहे. काळ्या बाजारात याची किंमत यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. गांजा तस्कर त्याच्या छोट्या छोट्या 50 ग्रॅमच्या प्लास्टिक पुड्या करून 100 ते 150 रुपयांना विकतात. त्यामुळे किरकोळ विक्री करणारे 30 ते 40 हजार रुपये प्रति किलो किंमतीने विक्री करतात.

गांजा तस्करीची टोळी सक्रिय-

सव्वा कोटींचा गांजा सोलापुरात पकडल्याने गांजा तस्करी करणारी मोठी टोळी सक्रिय झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत सोलापुरच्या एका संशयित इसमाला ताब्यात घेतले आहे. खोलवर तपास करून गांजा विक्री करणाऱ्याचे मुसक्या आवळणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक डॉ. प्रितेश देशमुखच्या घरात सापडले पोलीस भरतीचे कागदपत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.