पंढरपूर - पंढरपूर शहरात नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले ( Pandharpur Municipality Election ) आहे. त्यातच आता पंढरपुरच्या सर्व माजी आमदारांच्या पुतळ्यावरुन राजकारण तापले आहे. नगरपालिकेने सर्व माजी आमदारांचे पुतळे उभारण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्याविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला ( Opposition morcha On Municipality Pandharpur ) आहे. त्यामुळे शहरात पुतळ्याचे राजकारण सुरु झाले आहे.
नगरापालिकेवर परिचारक गटाची एकहाती सत्ता होती. येत्या दोन महिन्यांत पंढरपूर नगरपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे नगरपालिकेवर सध्या प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासक नेमणूक होण्यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंढपुरातील सर्व दिवगंत आमदारांचे पुतळे उभारण्यासाठी एक मताने मंजुरी दिली होती. मात्र, त्याला सर्वपक्षीयांनी विरोध दर्शवला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यामोर्चाला सर्व पक्षीय नेते उपस्थितीत होते. सर्व माजी दिवंगत आमदारांचे पुतळे उभारणीला विरोध नाही. मात्र. ज्या ठिकाणी हे पुतळे उभे केले जाणार आहे. त्याला विरोध असल्याचे दिलीप धोत्रे म्हणाले. या मागणीचे निवेदन नगरपालिकेचे कर्मचारी संजय पवार यांना देण्यात आले.
हेही वाचा - Eknath Khadse On BJP : भाजपचे दहशतवाद्यांशी संबंध; एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप