सोलापूर - ग्रामीण पोलीस दलातील 9 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. ग्रामीण पोलिस दलातील एकूण 13 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 9 जण हे कोरोनातून बरे झाले असल्याची माहिती सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात असलेल्या सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील एका पोलिसाला कोरोनाची लागण झाली होती. या एका पोलिसामुळे दुसऱ्याला आणि दोघांमुळे एकूण 13 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. या 13 पोलिसांच्या कुटुंबांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.
कोरोनाबाधित 13 पोलिसांची, उपचारानंतर पुन्हा चाचणी घेण्यात आली. यामध्ये 9 पोलीस कोरोनामधून बरे झाले आहेत. आणखी 4 पोलीस हे कोरोनाबाधित असून लवकरच त्यांच्या आणखी दोन टेस्ट घेण्यात येणार आहेत आणि ते ही लवकरच कोरोनावर विजय मिळवतील, असा विश्वास झेंडे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, काही भागात वादळी वाऱ्यासह गारा
हेही वाचा - सोलापुरात आणखी 21 जणांना कोरोनाची लागण; आतापर्यंत 364 कोरोनाबाधित, तर 150 जण कोरोनामुक्त