ETV Bharat / state

सोलापुरात कोरोनाचा कहर सुरूच, आज 1959 जणांना कोरोना

author img

By

Published : May 15, 2021, 9:11 PM IST

सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. सोलापूर जिल्ह्यात आज 1865 नवीन कोरोना रूग्ण आढळले, 35 जणांचा मृत्यू झाला. तर, सोलापूर शहरात 94 नवे रुग्ण आढळले आणि 7 रूग्णांचा मृत्यू झाला.

सोलापूर
सोलापूर

सोलापूर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज (15 मे) दिवसभरात शहर आणि जिल्ह्यात एकूण 1959 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर उपचार घेत असलेल्या एकूण 42 रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग हा कोरोना महामारीचा हॉटस्पॉट झाला आहे. आज सर्वाधिक रुग्ण पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात आढळले आहेत. शहरात परिस्थिती जरी नियंत्रणात येत असली तरी ग्रामीण भागातील वाढत्या रुग्णसंख्येचा लोंढा उपचारासाठी शहरातील विविध रुग्णालयात दाखल होत आहे. आजही शहरातील विविध रुग्णालयात उपचारासाठी बेड मिळवणे किंवा उपचार घेणे कठीणच आहे. कारण रुग्णालये रूग्णांनी भरली आहेत.

सोलापूर शहरात आज 94 नवे रुग्ण, तर 7 मृत्यू

सोलापूर शहरात शनिवारी (15 मे) 1518 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 94 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात 45 पुरुष आणि 49 स्त्रियांचा समावेश आहे. शहरात असलेल्या विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 7 कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 पुरुष आणि 3 स्त्रिया आहेत. शहरात 192 जण कोरोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पण ग्रामीण भागातील रुग्ण उपचार घेण्यासाठी सोलापूर शहरात दाखल होत आहेत. आजही शहरातील कोविडवर उपचार करणारी रुग्णालये खचाखच भरली आहेत. अनेक रुग्णांना आजही बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड प्राप्त करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा कोरोना महामारीचा हॉटस्पॉट झाला आहे. शनिवारी जिल्हा आरोग्य प्रशासनाने 6233 जणांची तपासणी केली. यातील 1865 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात 1134 पुरुष आणि 731 स्त्रियांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 35 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 20 पुरुष आणि 15 स्त्रिया आहेत. जिल्ह्यातील 2048 कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. शनिवारी पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक 447 रुग्ण आढळले. तर, मंगळवेढा तालुक्यात 310, माळशिरस 256, माढा 202, बार्शी 175, करमाळा 114, मोहोळमध्ये 146 रुग्ण आढळले.

हेही वाचा - कोरोनाच्या तीसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.