ETV Bharat / state

सोलापुरातील सीएनएस हॉस्पिटल येथे ऑक्सिजन प्लांट सुरू होणार - ऑक्सिजन प्लांट सोलापूर

solapur oxygen plant, solapur collector
सोलापूर जिल्हाधिकारी
author img

By

Published : Apr 22, 2021, 4:55 PM IST

सोलापूर - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ऑक्सिजन संबंधित संयुक्त बैठक झाली. या बैठकीत खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टर, ऑक्सिजन पुरवठा करणारे डीलर, सब डीलर आणि ऑक्सिजन उत्पादन करणारे कंपन्यांचे अधिकारी आदी उपस्थित होते. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता ऑक्सिजन तुटवडा आणि बेडची व्यवस्था याचे नियोजन कसे करता येईल, यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत मंगळवेढा रोडवर असलेल्या सीएनएस हॉस्पिटलने ऑक्सिजन उत्पादन करण्यासाठी तयारी दर्शवली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

योग्य नियोजन केल्यास सोलापुरात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत-

सोलापुरातील आरोग्य प्रशासनाने रुग्णांवर उपचार करत असताना योग्य नियोजन करून उपचार केल्यास ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी शंभरकर यांनी व्यक्त केली. तसेच रेमडेसिविर इंजेक्शन हे शासनाकडून संबंधित रुग्णालयाला योग्य पुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. पण आज देखील अनेक रुग्ण रेमडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण भटकत आहेत.

ऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना-

ऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्यासाठी सीएनएस हॉस्पिटलने तयारी दर्शवली आहे. पण आज ही सोलापुरातील अनेक खासगी दवाखाने ऑक्सिजनचा तुटवडा होत असल्याने नव्या रुग्णांना ऍडमिट करून घेत नाहीत. शासन एकीकडे दावा करत आहे की,ऑक्सिजन तुटवडा नाही ,तर दुसरीकडे अनेक खासगी रुग्णालये ऑक्सिजन नाही म्हणून सांगत आहेत. प्रशाकीय अधिकारी यासर्व गोष्टी वर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

ऑक्सिजन सिलेंडरचे दर कडाडले-

सोलापूरात ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या अर्निकेम, एल आर इंडस्ट्रीज,आणि आर टी एस या कंपन्या आहेत. एक ऑक्सिजन सिलेंडर सद्यस्थितीत 500 ते 600 रुपयांना मिळत आहे. प्रशासन याकडे मात्र डोळेझाक करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.