ETV Bharat / state

सोलापूरात शनिवारी कोरोनाचा कहर; 126 रुग्ण वाढले तर 4 रुग्णांचा मृत्यू - सोलापूर कोरोना अपडेट

आजपर्यंत सोलापूर शहरात 2 हजार 582 रुग्ण झाले आहेत. तर 267 जणांचा मृत्यू झाला आहे.

Solapur covid 19
सोलापूरात शनिवारी कोरोनाचा कहर;126 रुग्ण वाढले तर 4 रुग्णांचा मृत्यू
author img

By

Published : Jul 5, 2020, 7:15 AM IST

सोलापूर - शुक्रवारी 163 रुग्ण वाढलेले असताना शनिवारी पुन्हा कोरोनाचा कहर दिसून आला. शहर व जिल्ह्यात असे मिळून 126 रुग्ण वाढले आहे. तर शहरात 4 महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत सोलापूर शहरात 2 हजार 582 रुग्ण झाले आहेत. तर 267 जणांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी व शनिवारी सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शनिवारी शहराचे 349 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले असून 266 अहवाल निगेटिव्ह आले तर 83 अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये 48 पुरुष व 35 महिलांचा समावेश आहे. तर 4 महिलांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत सोलापूर शहरात 2 हजार 582 रुग्ण झाले आहेत. तर 267 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर मधील ग्रामीण भागाचा विचार केला असता शनिवारी 43 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये 27 पुरुष व 16 महिलांची नोंद आहे. ग्रामीण भागात शनिवारी एकही मृत्यू झाल्याची घटना नाही. आजपर्यंत ग्रामीण भागात एकूण 520 रुग्ण आढळले आहे. तर 24 मृत्यू झाले आहेत.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर दौऱ्यावर होते. शहराच्या विविध भागात त्यांनी भेट दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली. कडक लॉकडाऊन बाबत किंवा कडक संचारबंदी बाबत खुलासा करत सांगितले, सध्या तरी आम्ही त्याचा अभ्यास करत आहोत. सर्व अधिकरी व लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घोषित करू. कमीत कमी 5 दिवस आधी त्याबाबत घोषणा करू असे पालकमंत्री यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.