सोलापूर - सोलापुरात गुरुवारी 18 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 488 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून गुरुवारी कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. यासह जिल्ह्यात आतापर्यंत 34 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर, कोरोनामधून बरे झालेल्या 35 जणांना गुरुवारी घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत 210 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
जिल्ह्यात आत्तापर्यंत 5 हजार 217 जणांची कोरोना चाचणी झाली आहे. यातील 5 हजार 14 अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील 4 हजार 526 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर, 488 जणांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले असून एकूण 203 अहवाल प्रलंबित आहेत. गुरुवारी एका दिवसात 183 अहवाल प्राप्त झाले. यातील 165 अहवाल निगेटिव्ह तर, 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये 10 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे. तर, जिल्ह्यात मृतांची संख्या 34 झाली असून यामध्ये 19 पुरुष आणि 16 महिलांचा समावेश आहे. आत्तापर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 210 इतकी झाली आहे. तर 244 जणांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी कोरोनामुळे मृत्यू झालेली ७२ वर्षीय व्यक्ती ही उत्तर सदर बझार लष्कर येथील आहे. 17 मे रोजी त्यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.
गुरुवारी आढळलेल्या रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे -
अशोक चौक 1 महिला
न्यू पाच्छा पेठ 1 पुरुष , 2 महिला
उत्तर कसबा पत्रा तालीम 1 पुरुष
कुर्बान हुसेन नगर 1 पुरुष
केशव नगर झोपडपट्टी 1 महिला
धुम्मा वस्तीभवानी पेठ 1 पुरुष
निलम नगर 1 पुरुष
सिव्हील रुग्णालय क्वार्टर 1 महिला
बेगम पेठ 1 पुरुष
बुधवार पेठ 1 महिला
न्यू बुधवार पेठ 1 पुरुष
कुमार स्वामी नगर 1 महिला
रेल्वे लाईन 1 पुरुष
कुमठा नाका 1 पुरुष
बाळीवेस 1 पुरुष
पाच्छा पेठ 1 महिला