ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यात आज 1777 जणांना कोरोना, 38 मृत्यू - solapur corona news

सोलापूर जिल्ह्यात आज नवीन 1777 जणांना कोरोना झाला. 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, आज सोलापूर शहरात नवीन रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे.

solapur
सोलापूर
author img

By

Published : May 3, 2021, 9:58 PM IST

सोलापूर - सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज (3 मे) नवीन 1777 जणांना कोरोना झाला आहे. तर 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून सोलापुरात कडक लॉकडाऊन सुरू आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी किंवा ब्रेक द चैन अंतर्गत कोरोना नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्याची कडक अंमलबजावणी स्थानिक प्रशासन करत आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे.

सोलापूर शहरात आज 121 जण पॉझिटिव्ह, 398 कोरोनामुक्त

सोलापूर शहरात कोरोना विषाणूची लाट ओसरताना दिसत आहे. कारण आज रुग्णांपेक्षा बरे होऊन गेलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सोलापूर शहरात आज नवीन 121 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 1579 जणांची तपासणी करण्यात आली होती. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 73 पुरुष, तर 48 स्त्रिया आहेत. सोलापूर शहरात आज 11 रूग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या मृतांमध्ये 6 पुरुष आणि 5 स्त्रिया आहेत. सोलापूर शहरात आज 398 रुग्ण बरे झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सोलापूर शहरात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. सोलापूर शहरात आजही 2388 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ते विविध रुग्णालयात उपचार घेत आहे.

सोलापूर ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक

सोलापूरचा ग्रामीण भाग आजदेखील हॉटस्पॉटच आहे. कारण, आज सोलापूर जिल्ह्याच्या विविध तालुक्यात 1656 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली. तर 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 964 पुरुष, तर 692 स्त्रिया आहेत. 27 मृतांमध्ये 22 पुरुष आणि 5 स्त्रिया आहेत. तर उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1552 आहेत. बरे झालेल्यांमध्ये 930 पुरुष आणि 622 स्त्रिया आहेत. आज पंढरपूर येथे सर्वाधिक 314 रुग्ण आढळले. माढा 267, करमाळा 215 आणि बार्शीत 190 रुग्ण आढळले. सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील रुग्णालयात सध्या 15321 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - ऑक्सिजनच्या तुटवड्याने दिल्लीमधील रुग्णांची दमछाक...न्यायालयाची केजरीवाल सरकारला नोटीस

हेही वाचा - नागपूरच्या 'पेपर बोर्ड कंपनी'ला भीषण आग, नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.