सोलापूर- शहरात कलेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी चार दिवसीय नॅशनल आर्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय पातळीवरील आर्ट कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी सहभागी होणार होते. मात्र, सोलापुरात विमानसेवा नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी सोलापुरातील या नॅशनल आर्ट कॅम्पकडे पाठ फिरविली आहे. शहरात विमान सेवा सुरू होत नसल्याची खंत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.
हेही वाचा- विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणवरून उच्च शिक्षणमंत्र्यांनी कुलगुरुंना झापले !
सचिन खरात यांच्या सोलापुरातील स्टुडिओमध्ये मुंबईच्या संस्था आणि जयडी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 ते 10 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय अर्थ कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी कोलकत्ता चेन्नई दिल्ली या मोठ्या महानगरासह देशभरातून विद्यार्थी सहभागी होणार होते. मात्र, त्यांना विमानसेवा नसल्यामुळे येता आले नाही.
केंद्र सरकारच्या उडान या योजनेमध्ये सोलापूर शहराचा समावेश झालेला होता. मात्र, बंद पडलेली ही विमानसेवा अजूनही सुरू होऊ शकली नाही. सोलापुरात उद्योग व्यवसाय वाढीसाठीवरही त्याचा परिणाम झाला आहे.