ETV Bharat / state

कोटपा कायद्या अंतर्गत गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल पावणेसहा लाखांचा माल जप्त

सोलापुरातील बेगम पेठ येथील एका पानटपरीचालकाच्या घरी व पानटपरीवर गुन्हे शाखेने छापा टाकला. यात तब्बल 5 लाख 76 हजार 600 रुपयांचा तंबाखू व अन्य साहित्य जप्त करण्यात आला आहे.

tobacco
tobacco
author img

By

Published : Jul 19, 2020, 12:58 PM IST

सोलापूर - कोटपा कायद्याअंतर्गत गुन्हे शाखेने कारवाई करत बेगम पेठ येथील यशोधरा रुग्णालयाजवळून 5 लाख 76 हजार 600 रुपयांचा तंबाखू व अन्य साहित्य साठा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 16 जुलै) सायंकाळी करण्यात आली आहे. यावेळी खलील अब्दुल हमीद हत्तूरे (वय 32 वर्षे, रा. रेल्वे लाईन्स फॉरेस्ट, सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन जेलरोड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

धुम्रपान व तंबाखू मिश्रित मावाच्या सेवनाने सोलापुरात तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहेत. त्यात अनेक नागरिकांचे बळी गेले आहेत. गुटख्यावर बंदी आल्यापासून सोलापुरात गुटख्याची जागा माव्याने घेतली आहे. सुमारे 13 ते 14 वर्ष वयोगटापासून ते 50 ते 60 वर्षे वयोगटातील सर्व पुरुष माव्याचे व्यसनी झाले आहेत. पण, मावा विक्रीस कोणतीही अधिकृत मान्यता नाही. तरी देखील सर्रासपणे व खुलेआम याची विक्री होते. कधी तर एकदा सोलापूर शहरात बोचरी कारवाई अन्न व औषध प्रशासनाकडून केली जाते.

टाळेबंदीच्या काळात गुटखा,तंबाखू व माव्याचा साठेबाजार सुरू झाला आहे. एकिकडे काम नसल्याने असंघटीत कामगार बेजार झाला आहे. तर दुसरीकडे व्यसनाच्या आहारी गेलेला या कामगार वर्गाची गुटखा, तंबाखू माफियांकडून लूट होत आहे. गुटखा माफियांकडून साठेबाजी करुन आवाच्यासव्वा पैसे उकळले जात आहे. परिणामी मोलमजूरी करणारा व व्यसनाच्या आहारी गेलेल्या मजुरांचीही मोठ्याप्रमाणात लुट होत आहे.

सोलापुरात गुटखा विक्री करणाऱ्यांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दी मावा विक्री करणाऱ्यावर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ला झाला होता. यामुळे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांसह गुटख्याचा पुरवठा करणाऱ्यांवरही कारवाई होणे गरजेची आहे.

गुन्हे शाखेने गुरुवारी सायंकाळी बेगम पेठ येथील खलील हत्त्तूरे यांच्या वर कारवाई करत त्याच्या राहत्या घरातून 830 किलो विविध प्रकारची तंबाखू, 1530 खिमामच्या बाटल्या, 72 बंडल विडीचे बॉक्स, असा एकूण 5 लाख 76 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांवर कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हत्तुरे याचा छोटा पानटपरीचा व्यवसाय आहे. जर याकडूनच इतक्या मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ हस्तगत झाला तर मोठ्या गुटखा माफियांकडून किती मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ हस्तगत होईल. यामुळे लहान-मोठ्या व्यापाऱ्यांसह मोठ्या गुटखा माफियांवरही कारवाई होणे गरजेची आहे.

कोटपा कायदा म्हणजे काय?

सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध अधिनियम कायदा 2003 हा केंद्राचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे गुन्हा आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आहे. तसेच अल्पवयीन मुलांकडून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्यास 1 लाख रुपये दंड व 7 वर्ष कारावासाची शिक्षा या कायद्यात नमूद करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.