ETV Bharat / state

Solapur City : मोदी सरकारने ईडीचे अधिकारी घेऊन मंत्रिमंडळ चालवावे; सोलापूर शहर काँग्रेसची टिका

author img

By

Published : Jul 26, 2022, 5:15 PM IST

सोलापूर शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ( Solapur Congress office bearer ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत सोनिया गांधी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित असतील तोपर्यंत धरणे आंदोलन ( Dharna movement ) करणार असल्याची माहिती काँग्रेसच्या पदाधिकऱ्यांनी दिली आहे.

Dharna movement
सोलापूर शहरात धरणे आंदोलन

सोलापूर- सोलापूर शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत सोनिया गांधी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित असतील तोपर्यंत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेसच्या पदाधिकऱ्यांनी दिली. शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, मोदी सरकारने अंमलबजावणी संचालनायचे (ईडी)चे अधिकारी मंत्रिमंडळात सामील करून घ्यावे आणि सरकार चालवावे अशी टीका केली. सोनिया गांधी मंगळवारी ईडी समोर दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लॉंद्रीग प्रकरणात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) ईडी ( ED office ) कार्यालयात हजर झाल्या आहेत.

सोलापूर शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले

मोदी सरकारने ईडीचे ऑफिसर मंत्रिमंडळात सामील करून घ्यावे- मोदी सरकार विरोधकांना जाणूनबुजून त्रास देत आहे. जुन्या प्रकरणात ईडीचौकशी मधून गुंतविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मोदी सरकारने ईडीच स्वतंत्र कार्यालया ऐवजी ईडीच्या अधिकाऱ्यांना मंत्रिमंडळात शामिल करून घ्यावे आणि मंत्रिमंडळ चालवावे असे सोलापूर काँग्रेसच्या पदाधिकऱ्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सोलापुरातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या धरणे आंदोलनात उपस्थित होते. जोपर्यंत सोनिया गांधी ईडी कार्यालात असतील तोपर्यंत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

21 जुलै ला चौकशीची पहिली फेरी तर आज मंगळवारी दुसरी फेरी - 21 जुलै रोजी अंमलबजावणी संचालयाने काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी यांची चौकशी केली होती. जवळपास दोन तास ही चौकशी चालली होती. प्रियांका गांधी, रॉबर्ट वाद्रा देखील ईडी कार्यालयात गेल्या होत्या. चौकशीच्या पहिल्या फेरीनंतर आज मंगळवारी 26 जुलै रोजी दुसरी फेरी सुरू झाली आहे. मंगळवारी दुसऱ्या फेरीचा ससेमिरा सुरू होताच देशभरात काँग्रेस आक्रमक झाली आहे. सोलापुरात देखील काँग्रेसने मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी हेमा चिंचोळकर, संजय हेमगड्डी, प्रकाश वाले, चेतन नरोटे, तिरुपती परकीपांडला आदी उपस्थित होते.

हेही वाचा :Solapur Agitation : सोलापूरात भीक मागो आंदोलन; लोकशासन आंदोलन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वेधले लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.