ETV Bharat / state

'...तसा राज्यपालांचा मी लाडका मंत्री'

author img

By

Published : Feb 12, 2021, 5:55 PM IST

Updated : Feb 12, 2021, 8:35 PM IST

महाविकास आघाडी आणि राज्यपाल असा कोणताही वाद नाही. राज्यपालांना विमान नाकारणे ही नियमानुसार झालेली कारवाई आहे. माझ्याकडे उच्च तंत्रशिक्षण विभागाचा पदभार आहे. विद्यापीठाच्या कामानिमित्त व विद्यार्थी प्रश्नांसाठी मला नेहमी राज्यपालांकडे जावे लागते.

minister uday samant
उदय सामंत

सोलापूर - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांचा संघर्ष वाढतच असल्याचे चित्र तयार झाले आहे. हे प्रकरण ताजे असताना उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा मी लाडका मंत्री आहे, असे वक्तव्य केले आहे. राज्यपाल कुलपती असल्याने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून मला राज्यपालांकडे नेहमी जावे लागते. त्यामुळे राज्यपाल आणि माझे चांगले संबंध आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री सामंत यांनी दिली. ते आज (शुक्रवारी) विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबारात उपस्थित होते.

माध्यमांशी संवाद साधताना मंत्री उदय सामंत.

नियमानुसार वागावे -

महाविकास आघाडी आणि राज्यपाल असा कोणताही वाद नाही. राज्यपालांना विमान नाकारणे ही नियमानुसार झालेली कारवाई आहे. माझ्याकडे उच्च तंत्रशिक्षण विभागाचा पदभार आहे. विद्यापीठाच्या कामानिमित्त व विद्यार्थी प्रश्नांसाठी मला नेहमी राज्यपालांकडे जावे लागते. माझे कोणतेही काम आजतागायत राज्यपालांनी अडविले नाही. मात्र, जे काही नियम आहेत. त्यानुसार प्रत्येकाने वागावे, असे मला वाटते असेही उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा - सर्वांची विमाने उतरतील अशी धावपट्टी तयार करायची आहे - मुख्यमंत्री

अध्यासन केंद्रासाठी एक कोटींचा निधी -

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अध्यासन केंद्रासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहितीही सामंत यांनी दिली. तसेच महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी 50 लाख रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

प्रत्येक विद्यापीठात विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र -

सोलापूर विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तक्रार निवारण केंद्र नसल्याची बाब उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यावेळी त्यांनी सोलापुरात घोषणा केली की, लवकरच सोलापूर विद्यापीठासह राज्यातील सर्व विद्यापीठामध्ये विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र स्थापन केले जाईल.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया -

राज्यपालांना हेलीपॅड नाकरले गेले हा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. पालघर येथील जव्हार भागात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एका दौऱ्यानिमित्त आले होते. त्यांनी यावेळी सर्वांची विमाने उतरलतील, अशी धावपट्टी तयार करायची आहे, असे खोचक वक्तव्य प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

काय घडले होते ?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील वाद काही थांबताना दिसत नाही. उलटपक्षी या वादात रोज नवीन अंक जोडला जाऊन, हा वाद विकोपाला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. आज या वादाच्या अंकात नवी भर पाडली असून राजभवनावरील हेलिपॅड वापरणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळले आहे. काल (गुरुवारी) 11 फेब्रुवारीला राज्यपाल यांना उत्तराखंड येथे कार्यक्रमानिम्मित जायचे होते. मात्र, त्यांच्या विमान प्रवासाला राज्यसरकारकडून नकार कळवण्यात आला. त्यामुळे राज्यपालांना चक्क विमानातून खाली उतरण्याची नामुष्की आली. त्यानंतर राजकीय बराच वादही पेटला. त्यामुळे आज राजभवनावर जाऊन तेथील हेलिपॅड वापरणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळले आहे.

Last Updated : Feb 12, 2021, 8:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.