ETV Bharat / state

सोलापूर : शहरातील दुकाने उघडा, महापालिकेसमोर व्यापाऱ्यांचा ठिय्या - सोलापूर कडक निर्बंध बातमी

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. 1 जूनपासून हे निर्बंध बंद होऊन सर्व सुरळीत सुरू होईल, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा होती. पण, तसे झाले नाही. यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी महापालिकेसमोर ठिय्या मांडला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी फोनवरून दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jun 2, 2021, 4:34 PM IST

Updated : Jun 2, 2021, 4:50 PM IST

सोलापूर - शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडा या मागणीसाठी सोलापूर महानगरपालिकेसमोर बुधवारी (दि. 2 जून) ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलन माजी आमदार दिलीप माने, नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक अमोल शिंदे, तसेच व्यापारी संघटनेचे नेते, पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले.

महापालिकेसमोर व्यापाऱ्यांचा ठिय्या

उद्या बाजारपेठा खुले होण्याची शक्यता

चंदूसिंह देडीया या व्यापाऱ्याने तर प्रतिकात्मक सलाईन लावून बेडवर झोपून आंदोलन केले. एक तासानंतर व्यापारी वर्गाच्या शिष्टमंडळाने आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन शहरातील सर्व बाजारपेठा खुले करण्याची मागणी केली. व्यापाऱ्यांचे संताप पाहून आयुक्तांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोनवरून संपर्क केला. त्यानंतर मुंबईतील वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबर बोलणे झाले. दुकाने खुली करण्याबाबत सकारात्मक तोंडी आदेश देण्यात आले आहे गुरुवारपासून सर्व बाजारपेठा खुले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

तब्बल दोन तास आंदोलन सुरू होते. परिस्थिती गंभीर होत चालली होती. आयुक्तांना लेखी आदेश मागून व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पून्हा आंदोलनाची भूमिका घेत पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पून्हा आंदोलन सुरू केले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आंदोलनात असलेल्या माजी आमदार दिलीप माने यांना फोनवरून संपर्क केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून तोडगा काढू, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा - शहरातील दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या, व्यापाऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Last Updated : Jun 2, 2021, 4:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.