ETV Bharat / state

MD drugs seized : सोलापूरला पुन्हा ड्रग्जचा अड्डा ; ड्रग्ज डीलर छोटूच्या उत्तरप्रदेशातून आवळल्या मुसक्या, एक कोटींचं एमडी ड्रग्स जप्त - ड्रग्ज डीलर छोटूच्या मुसक्या आवळल्या

MD drugs seized : सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील मोहोळ पोलिसांनी ड्रग्ज डीलर छोटू उर्फ चंद्रभान सिंग मोहनलाल कौल याला उत्तरप्रदेशातून अटक केली आहे. तसंच या ड्रग्ज डीलरकडून एक कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे.

Drug dealer Chhotu arrested from Uttar Pradesh
ड्रग्ज डीलर छोटूला उत्तरप्रदेशातून अटक, एक कोटींचे एमडी ड्रग्स जप्त
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 9:46 AM IST

सोलापूर MD drugs seized : सोलापूर शहरानजीक असलेल्या चिंचोळी एमआयडीसीचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. सोलापूर पोलिसांनी केलेल्या तपासात एक कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील मोहोळ पोलिसांनी उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात जाऊन ड्रग्ज डीलर छोटूच्या मुसक्या आवळल्या आहेत. छोटू उर्फ चंद्रभानसिंग कौल असं अटक केलेल्या संशयीत आरोपीचं नाव असून तो सोलापूर एमआयडीसीत ड्रग्ज तयार करुन उत्तर प्रदेशात जाऊन विक्री करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मोहोळ पोलिसांची कारवाई : मोहोळ पोलिसांनी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर कारवाई करत दत्तात्रय लक्ष्मण घोडके व गणेश उत्तम घोडके (रा औंढी,ता मोहोळ जि सोलापूर) या दोघांना एमडी ड्रग्ज साठ्यासह अटक केली होती. ड्रग्ज विक्री करणाऱ्या घोडके बंधूचा कसून तपास करत असताना, तिसऱ्या संशयीत आरोपीचा सुगावा मोहोळ पोलिसांना लागला. सध्या राज्यभरात ड्रग्ज प्रकरणी कारवाया होत असल्यानं ड्रग्ज डीलर छोटू उत्तर प्रदेशात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मोहोळ पोलिसांनी उत्तर प्रदेशातील चित्रकूट इथं जाऊन छोटू उर्फ चंद्रभान सिंग मोहनलाल कौल यास ताब्यात घेतलं. त्याच्याकडून 1 कोटी 27 लाखांचा एमडी ड्रग्जसाठा जप्त केला. तसंच छोटूनं सोलापूर इथं चिंचोळी एमआयडीसीतील ड्रग्ज फॅक्टरीची माहिती दिल्यानंतर मोहोळ पोलिसांनी त्या ठिकाणी जात कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जसदृश्य कच्चा माल जप्त केला.

छोटूची पोलीस कोठडीत रवानगी : छोटू उर्फ चंद्रभान हा उत्तर प्रदेशातील चित्रकूट या ठिकाणी लपून बसला होता. उत्तर प्रदेशात जाऊन छोटूला बेड्या ठोकल्यानंतर शुक्रवारी दिवसभर मोहोळ पोलिसांनी कसून तपास करत चिंचोळी एमआयडीसीत दुसऱ्या एका ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केला. यावेळी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज सदृश्य अमली पदार्थ जप्त करुन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आलं आहे. तसंच शुक्रवारी छोटूला मोहोळ कोर्टात हजर केलं असता, त्याची 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलचे मराठवाडा कनेक्शन; कच्चा माल घेण्यासाठी पसरले जाळे, ससूनमधून पळाल्यावर थांबला संभाजीनगरात?
  2. Nashik Drug Case : मोठी बातमी! नाशिकमधील गिरणा नदीत सापडलं 100 कोटींचं ड्रग्ज, पोलिसांकडून अंडरवॉटर शोधमोहीम
  3. Nashik Drug Case : ड्रग्ज प्रकरणानंतर नाशिक पोलीस सतर्क; परदेशी विद्यार्थ्यांची कसून तपासणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.