ETV Bharat / state

सोलापुरात तेलगू भाषिकांकडून मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव उत्साहात साजरा

मार्कंडेय महामुनी यांच्या जन्मोत्सवानिमित्त रथाची मिरवणूक काढण्यात आली. रथोत्सव मिरवणुकीमध्ये श्रींची पालखी आकर्षक व सुवासिक फुलांनी सजवण्यात आली होती. श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मांदियाळी यावेळी पाहायला मिळाली.

मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव
author img

By

Published : Aug 15, 2019, 7:44 PM IST

Updated : Aug 15, 2019, 8:05 PM IST

सोलापूर - मार्कंडेय महामुनी यांच्या जन्मोत्सवानिमित्त शहरात आज रथाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष महेश कोठे, महापौर शोभाताई बनशेट्टी, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या.

मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव उत्साहात साजरा

पिवळ्या धमक बैलजोडीच्या रथावर आरूढ असलेली श्रींची सुबक मूर्ती या मिरवणुकीत आकर्षणाचे केंद्र ठरली होती. पारंपरिक ढोल ताशा आणि बँड पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मार्कंडेय महामुनी यांच्या जयघोषात विजापूर वेस येथून मिरवणूक मार्गस्थ झाली. मिरवणूक मार्गामध्ये नाविन्यपूर्ण अशी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी संपूर्ण परिसर आनंदाने भारावून गेला होता.

श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच लांब रांगा लावल्या होत्या. या रथोत्सव मिरवणुकीमध्ये श्रींची पालखी आकर्षक व सुवासिक फुलांनी सजवण्यात आली होती. श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मांदियाळी यावेळी पाहायला मिळाली. या सोहळ्याला मनपा सभागृह नेते श्रीनिवास करली, माजी सभागृह नेता संजय कोळी, नगरसेविका कुमुद आकरांम, श्रीकांचन यन्नम, गटनेते आनंद चंदनशिवे, सुरेश फलमारी तसेच पद्मशाली समाज बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Intro:सोलापूर : तेलगू भाषिकांचं श्रध्दास्थान असलेल्या मार्कंडेय महोत्सवाला सोलापुरात
मोठ्या उत्साही वातावरणात सुरुवात झाली.
मार्कंडेय महामुनी यांच्या या जन्मोत्सव रथोत्सवाला पद्मशाली समाजचे अध्यक्ष महेश कोठे,महापौर शोभाताई बनशेट्टी,पालकमंत्री विजयकुमार देशमुख,आमदार प्रणिती शिंदे आदींच्या हस्ते उत्सव मूर्तीची पूजा करून या रथोत्सवाची मोठ्या भक्तिमय वातावरणात
मिरवणूक काढण्यात आली.Body:पिवळ्या धमक बैलजोडीच्या रथावर आरूढ असलेली श्रींची सुबक मूर्ती आकर्षणाचे केंद्र ठरत होती.पारंपारिक ढोल ताशा आणि बँड पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.मार्कंडेय महामुनी यांच्या जयघोषात मिरवणूक विजापूर वेस येथून मार्गस्थ झाली.मिरवणूक मार्गामध्ये नाविन्यपूर्ण अशी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.सर्व परिसर आनंदाने भारावून गेला होता.भाविकांच्या पहाटेपासून लांबच लांब रांगा श्रींच्या दर्शनासाठी लागल्या होत्या.या रथोत्सव मिरवणुकीमध्ये श्रींची पालखी आकर्षक व सुवासिक फुलांनी सजवण्यात आली होती.श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच मांदियाळी यावेळी पाहायला मिळाली.
Conclusion:या सोहळ्याला मनपा सभागृह नेते श्रीनिवास करली,माजी सभागृह नेता संजय कोळी, नगरसेविका कुंमुद आकरांम, श्रीकाचंन यन्नम,गटनेते आनंद चंदनशिवे, सुरेश फलमारी तसेच पद्मशाली समाज बांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
Last Updated : Aug 15, 2019, 8:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.