सोलापूर - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (रविवारी) 4 जुलैला आक्रोश मोर्चाचे अयोजन करण्यात आले आहे. कोरोना महामारी रोखण्यासाठी पोलिसांनी आक्रोश मोर्चास परवानगी नाकारण्यात आली आहे. पोलीस परवानगी नसताना देखील मोर्चा काढण्यात येणार आहे. संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. लाखोंच्या संख्येने या मोर्चाला मराठा बांधव दाखल होतील आणि कोरोना विषाणूचा उद्रेक होईल या भीती पोटी सोलापूर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस परवानगी नाकारली आहे.
मोर्चाला येणारे सर्व मार्ग बंद -
संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जुना पुणे नाका येथील संभाजी चौक येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. मात्र, पोलिसांनी सर्व मार्ग बंद केले आहे. शहरातील मराठा बांधव पायी चालत संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पायी चालत येत आहेत. तालुक्यातील मराठा बांधवाना शहराच्या बाहेर नाक्यावरच पोलिसांकडून अडविले जात आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने अधिवेशनाचा एक दिवस वाढवावा - खा. रणजितसिंह निंबाळकर
संभाजी महाराज पुतळा परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप -
लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आक्रोश मोर्चाला येतील. यामुळे सोलापूर शहर पोलिसांनी सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातील पोलीस फौजफाटा मागविला आहे. तसेच 1200 पोलीस कर्मचारी या मोर्चाला बंदोबस्त साठी तैनात केले आहे. आक्रोश मोर्चा परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.