ETV Bharat / state

नरभक्षक बिबट्याचा तिसरा बळी; ऊसतोड कामगाराची मुलगी भक्ष्यस्थानी - leopard attacked eight years old girl

करमाळ्यात बिबट्याने हल्ला केल्याने एका आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. आई-वडिल ऊसतोड करत असताना बिबट्याने या मुलीला गळ्याला पकडून फरफटत नेले.

leopard in karmala tehsil
नरभक्षक बिबट्याचा तिसरा बळी; ऊसतोड कामगाराची मुलगी भक्ष्यस्थानी
author img

By

Published : Dec 7, 2020, 3:41 PM IST

सोलापूर - करमाळा तालुक्यातील चिकलठाणा येथे ऊस तोडणीसाठी आलेल्या कामागाराच्या मुलीचा गळा बिबट्याने जबड्यात पकडला. यानंतर तिला फरफटत नेले. या दुर्घटनेत संबंधित मुलीचा मृत्यू झाला आहे. फुलाबाई हरीचंद कोठले(वय 8 वर्ष) असे मृत चिमुरडीचे नाव आहे. ही सलग तिसरी घटना असून या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग आक्रमक पावलं उचलत आहे. या घटनेमुळे करमाळ्यात बिबट्याची दहशत पसरली आहे.

खेळत असलेल्या चिमुरडीला बिबट्याने ओढत नेले

फुलाबाई कोठले ही आठ वर्षांची मुलगी शेतात खेळत होती. आई-वडिल ऊस तोडणी करत होते. यावेळी नरभक्षक बिबट्याने केळीच्या शेतातून हल्ला केला. चिमुरडीच्या गळ्याला पकडून त्याने ओढण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज सोमवारी सकाळी घडली. उपस्थितांनी आरडाओरड करत बिबट्याला पिटाळून लावले. परंतु तोपर्यंत बिबट्याने मुलीला गंभीर जखमी केले होते.

नरभक्षक बिबट्याचा तिसरा बळी; ऊसतोड कामगाराची मुलगी भक्ष्यस्थानी

उपचार सुरू असताना मृत्यू

नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात फुलाबाई ही आठ वर्षांची मुलगी जबर जखमी झाली होती. तिला करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुपारी 1 च्या दरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे अधीक्षक डॉ. अमोल डुकरे यांनी सांगितले.

leopard in karmala tehsil
करमाळ्यात बिबट्याने हल्ला केल्याने एका आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

वनखाते ठाण मांडून ; 30 पिंजरे लावले

बीड जिल्ह्यातील आष्टी येथून करमाळ्यात आलेल्या नरभक्षक बिबट्याने एका आठवड्यात तिघांचा बळी घेतला आहे. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी करमाळ्यात विविध ठिकाणी उसाच्या फडांमध्ये 30 पिंजरे लावले आहेत. मात्र, करमाळा शहरासह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.