ETV Bharat / state

श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता

author img

By

Published : Dec 1, 2020, 10:33 PM IST

परंपरेप्रमाणे श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दहिहांडी फोडण्यात आली. संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजांकडून आषाढी व कार्तिकी वारीमध्ये महाव्दार काल्याचा सोहोळा साजरा करण्याची परंपरा आहे. संत पांडुरंग महाराज यांना चारशे वर्षापूर्वी प्रत्यक्ष विठुरायाने आपल्या खडावा अर्थात, पादुका दिल्या होत्या अशी अख्यायिका आहे. तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो.

Kartiki Yatra Pandharpur
महाव्दार काला श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर

सोलापूर - यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाव्दार काला मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. या काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता झाली. संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजांकडून आषाढी व कार्तिकी वारीमध्ये महाव्दार काल्याचा सोहोळा साजरा करण्याची परंपरा आहे. संत पांडुरंग महाराज यांना चारशे वर्षापूर्वी प्रत्यक्ष विठुरायाने आपल्या खडावा अर्थात, पादुका दिल्या होत्या, अशी अख्यायिका आहे. तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो.

मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर देवाच्या पादुका पागोट्याने बांधण्यात आल्या. नंतर नामदास महाराज यांनी मदन महाराज यांना खांद्यावर घेवून मंदिरातील सभामंडप येथे पाच प्रदक्षिणा पूर्ण करून दहिहांडी फोडली.

महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता

महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता झाली. कोरोनामुळे यंदा आषाढीनंतर कार्तिकी यात्रा ही प्रतिकात्मक स्वरुपातच साजरी झाली आहे. दशमी व एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी होवू नये यासाठी संचारबंदी पुकारण्यात आली होती. तर, २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. कोरोनामुळे पंढरपूरचे श्री. विठ्ठल मंदिर १७ मार्च २०२० पासून आठ महिने बंद होते. ते दिवाळी पाडव्यापासून भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. सध्या भाविकांना कोरोनाविषयक आरोग्याचे सर्व नियम पाळून ऑनलाइन बुकिंगनंतर श्रींचे मुखदर्शन देण्याची व्यवस्था समितीने केली आहे. याचा लाभ रोज ३ हजार भाविकांना मिळत आहे. दरम्यान, मंदिर दर्शनासाठी बंद होते तेव्हा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेचे सर्व नित्योपचार व राजोपचार परंपरेप्रमाणे सुरू होते.

हेही वाचा - सोलापूर: पदवीधर 62.7 टक्के तर शिक्षक मतदारसंघासाठी 85.09 टक्के मतदान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.