ETV Bharat / state

परप्रांतियांना सोडण्यासाठी कर्नाटकातून 81 बस रवाना - state

संचारबंदीच्या काळात परप्रांतियांचे हाल होत असल्याने काही परप्रांतीय हे चालत आपल्या गावाकडे निघाले. पण, त्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी कर्नाटक सरकारने 81 एस.टी. बसेसची सोय केली असून त्यांना त्यांच्या गावी पोहोचविणार आहेत.

बसेसची लागलेली रांग
बसेसची लागलेली रांग
author img

By

Published : Mar 29, 2020, 1:08 PM IST

सोलापूर - कर्नाटकात अडकून पडलेल्या परराज्यातील कामगारांना सोडण्यासाठी 81 बसेस या राजस्थान, बिहार आणि हरियाणाकडे निघाल्या आहेत. या 81 बसेस आज सकाळी 11 च्या सुमारास कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर आल्या होत्या.

सोलापूर जिल्ह्याची सीमा असलेल्या नांदणी येथे या 81 बसेस आल्या होत्या. कामाच्या शोधात बिहार, हरियाणा व राजस्थान या राज्यांतील हजारो कामगार हे कर्नाटकात आलेले आहे. रोजंदारीवर हे लोक कर्नाटकात राहतात. 21 दिवसांच्या लॉक डाऊनमध्ये हे कामगार कर्नाटकात अडकून पडले होते. या कामगारांना त्यांच्या राज्यात मूळगावी पाठविण्यासाठी कर्नाटकातून 81 बसेस निघाल्या आहेत. या बसेस आज सकाळी सोलापूर जिल्ह्यातील कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर आल्या होत्या. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर सोलापूर जिल्ह्यातील नांदणी या गावात या 81 बसेस थोडावेळासाठी थांबल्या होत्या. त्यानंतर त्या सोलापूर मार्गे पुढे मार्गस्थ झाल्या. या 81 बसमध्ये बिहार, हरियाणा व राजस्थान येथील कामगार आहेत.

हेही वाचा - सोलापूर : 'कोरोना जा ना रे जा', माढ्याच्या शिंदे बंधूचे गीत व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.