माढा (सोलापूर) : माढ्यातील सह्याद्री परिवाराच्या वतीने आईसाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या रुपात महालक्ष्मी (गौरी) उभारणी केली आहे. गेल्या १८ वर्षांपासून हा परिवार पुस्तकरूपी आरास उभी करुन पुस्तके वाचण्याचा संदेश देत आहे. यंदाच्या वर्षी देखील या परिवाराने माॅसाहेब जिजाऊ ना सिंहासनावर तर सावित्रीबाई फुले यांना उभ्या स्वरुपात ठेवण्यात आल्या आहेत.
महिलांना पुस्तकं भेट
सह्याद्री परिवाराच्या शारदा शिंदे, धनश्री शिंदे यांनी विद्युत रोषणाई, फुलाची आरास यासह अन्य पारंपरिक गौरी सजावटीला पूर्णपणे बगल देत राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या रुपात गौरी उभ्या केल्या आहेत. हळदी कुंकवासाठी येणाऱ्या महिलांना शिंदे प्रबोधनाची पुस्तके भेट देत आहेत. विविध प्रबोधनात्मक पुस्तके व समाजातील विविध ज्वलंत समस्यांविषयी सकारात्मक संदेश देऊन गौरी सजावट करण्याचा उपक्रम मागील १८ वर्षापासून राबवला जात आहे.
वाचन चळवळीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश
'मराठा सेवा संघाच्या विचाराने प्रेरित होऊन जिजाऊ सावित्रीचा विचार घरोघरी जावा. प्रबोधनात्मक पुस्तकाच्या माध्यमातून वाचन चळवळीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानेच आरास मांडण्याचा उपक्रम सुरुच ठेवला आहे', असे शारदा शिंदे, दत्ताजी शिंदे यांनी सांगीतले.
हेही वाचा - परिवहन मंत्री अनिल परब गोत्यात; किरटी सोमय्यांच्या रडावर 11 मंत्री, सरकारचा डेरा डळमळीत?
हेही वाचा - अलर्ट! पुढील चार दिवस मुसळधार बरसणार, गोदावरी ओव्हरफ्लो
हेही वाचा - विराट कोहली देणार वन-डे आणि टी-20च्या कर्णधारपदाचा राजीनामा? कोणाला मिळणार कर्णधारपदाची जबाबदारी?
हेही वाचा - किरीट सोमैयांची पत्रकार परिषद, हसन मुश्रीफांवर केला मनी लाँड्रिंगचा आरोप