ETV Bharat / state

विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल, विठ्ठल मंदिर समितीकडून जय्यत तयारी - गहिनीनाथ महाराज औसेकर

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून माघी यात्रा प्रातिनिधिक स्वरूपाची साजरी करण्यात आली होती. मात्र यंदा कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे विठ्ठल व रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांसाठी कोरोना नियमांचे पालन करून श्री. विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मुखदर्शन दिले जात आहे.

विठ्ठल मंदिर
विठ्ठल मंदिर
author img

By

Published : Feb 12, 2022, 7:12 AM IST

पंढरपूर - श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा माघी वारी सोहळा होणार आहे. त्यासाठी पंढरपुरात लाखो भाविक पालख्या दिंड्या दाखल झाले आहे. या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पूर्ण उपाययोजना करण्यात आल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिले आहे.

विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून माघी यात्रा प्रातिनिधिक स्वरूपाची साजरी करण्यात आली होती. मात्र यंदा कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे विठ्ठल व रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांसाठी कोरोना नियमांचे पालन करून श्री. विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मुखदर्शन दिले जात आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. तर विठुरायाचे मुखदर्शनाची रांग पाच किलोमीटर पर्यंत गेली आहे. या सर्वांना विठ्ठल मंदिर समितीकडून विविध उपाययोजना केल्याची माहितीही गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

माघी वारीसाठी पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये चार पोलीस अधिकारी, 35 पोलीस निरीक्षक व शंभर सहाय्यक पोलीस निरीक्षक बंदोबस्तासाठी असणार आहे. तर बाराशे पोलीस कर्मचारी ही माघी वारीसाठी कार्यरत असलेल्या आहेत तर त्याचबरोबर एसआरएफ टीम तयार असणार आहे. नऊ ठिकाणी पंढरपूर बाहेर वाहन स्थळाची उभारणी करण्यात आली आहे. पंढरपूर शहरातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.