ETV Bharat / state

उजनी जलाशयाबाबतचा निर्णय; जनहित शेतकरी संघटनेचे बोंबाबोंब आंदोलन - janahit shekari sanghatana agitation on ujani dam water

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी पाच टीएमसी पाणी देण्यासाठी मंजुरी दिली होती. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व इतर संघटनेने या निर्णयाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची दखल घेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पाच दिवसापूर्वी 5 पाच टीएमसी बाबत घेतलेला निर्णय रद्द करत असल्याचे सांगितले होते.

Burning of the symbolic statue of Jayant Patil
जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
author img

By

Published : May 25, 2021, 3:09 PM IST

Updated : May 25, 2021, 3:30 PM IST

पंढरपूर - उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्याचा आदेश रद्द केला आहे. त्याची तोंडी नको तर लेखी स्वरुपात अध्यादेश काढा, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांचे नेतृत्वाखाली भिमानगर येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. त्याचवेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यामुळे उजनी संदर्भातील आंदोलन आता उद्रेक होत असल्याचे दिसून येत आहे.

आंदोलनादरम्यान जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला

उजनी संदर्भातील राज्य शासनाने लेखी आदेश घ्यावा -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी पाच टीएमसी पाणी देण्यासाठी मंजुरी दिली होती. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व इतर संघटनेने या निर्णयाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची दखल घेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पाच दिवसापूर्वी 5 पाच टीएमसी बाबत घेतलेला निर्णय रद्द करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पाच दिवस उलटून गेल्यानंतरही राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचा अध्यादेश काढण्यात आला नाही. त्यामुळेच भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उजनी येथील भीमा नगर परिसरात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. सोमवारी शेतकरी संघटनेकडून जलसंपदामंत्री पाटील यांच्या प्रतिआत्मक पुतळ्याचे दहन करून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा - 'बाजार बंद करा' म्हणताच, फळ विक्रेत्यांनी केला पोलिसांवर हल्ला, डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न

भिमानगर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त -

जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने उजनी धरण परिसरातील भीमनगर येथे बेमुदत उपोषण चालू करण्यात आले आहे. या आंदोलनासंदर्भात जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्यातच जयंत पाटील यांचा पुतळा जाळल्यानंतर पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी परिसरातील पोलीस बंदोबस्तही वाढवला आहे. यामुळे शेतकरी संघटना उजनी संदर्भात राज्य सरकार विरोधात आक्रमक होताना दिसत आहे.

संभाजी ब्रिगेड कडून आंदोलनात सक्रिय सहभाग

उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाण्यासंदर्भातील अध्यादेश राज्य सरकारने त्वरित काढावा, अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात कुंडले जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप यांनी राज्य सरकारला दिला आहे. शेतकरी संघटनेसह आता सोलापुर संभाजी ब्रिगेड उजनी संदर्भात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - धक्कादायक! गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना मृतदेहांची अदलाबदल

Last Updated : May 25, 2021, 3:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.