ETV Bharat / state

निवडणूक आयोगाने मागवली गाव पातळीवरील कोरोनाची माहिती, ग्रामपंचायत निवडणुकांची हालचाल सुरू

author img

By

Published : Oct 5, 2020, 9:01 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्या निवडणुका ठप्प झाल्या आहेत. ग्रामपंचायत कायद्यात सुधारणा करुन ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने संबंधित ग्रामपंचायतींच्या कोरोना स्थितीची माहिती मागवली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पंढरपूर (सोलापूर) - कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका ठप्प झाल्या आहेत. ग्रामपंचायत कायद्यात सुधारणा करुन ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. गावातील कोरोनाची स्थिती पाहून निवडणूक घेण्याच्या हलचाल राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने सुरू करण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींची गाव निहाय कोरोनाची स्थिती आयोगाने मागितली आहे. जुलै ते डिसेंबर या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींची मुदत पूर्ण होत असल्याने हा टप्पा जिल्ह्यासाठी महत्वाचा मानला जातो.

जुलैमध्ये 4, ऑगस्टमध्ये 123 ग्रामपंचायतींची मुदत पूर्ण झाली आहे. या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये एकाही ग्रामपंचायतीचा कालावधी पूर्ण झाला नाही. ऑक्‍टोंबरमध्ये 6, नोव्हेंबरमध्ये 519 आणि डिसेंबरमध्ये 6 ग्रामपंचायतींचा कालावधी पूर्ण होत आहे. नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक 519 ग्रामपंचायतींचा कालावधी पूर्ण होत आहे. गावाची निवडणूक होणार की प्रशासक येणार याबद्दल ग्रामस्थांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

निवडणूक आयोगाने माहिती मागितल्यामुळे निवडणूकीच्या हालचालींना वेग आला आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली होती. प्रभाग रचना आणि सरपंच आरक्षण सोडत यासाठी प्रशासकीय पातळीवर कामकाज सुरू झाले होते. प्रारुप याद्याही तयार करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - महावितरणला 'शॉक'.. लॉकडाऊनमुळे सोलापूर जिल्ह्यात 197 कोटीेचे वीजबिल थकित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.