पंढरपूर(सोलापूर) - जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस या तालुक्यात गुरुवारी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली, तर सातारा जिल्ह्यातही दमदार पाऊस झाल्याने वीर धरणाच्या पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आले आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. वीर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून अनेक भागात पावसाची संततधार सुरू होती. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नीरा देवघर, वडीवळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
वीर धरणाचा एक दरवाजा एक फुटाने उचलण्यात आला असून १३ ऑगस्टला नीरा नदीपात्रात ३२३६८ क्युसेक व वीजनिर्मिती प्रकल्पासाठी ८०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. नीरा नदी पात्रात एकूण ३२३६८ क्युसेकने विसर्ग सुरू असल्याचे सहाय्यक अभियंता विजय नलावडे यांनी सांगितले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पंढरपूर तालुका पर्जन्यमान मंडळनिहाय
करकंब- 15 मिमी, पट कुरोली-4 मिमी, भंडीशेगाव- 15 मिमी, भाळवणी- 18 मिमी, कासेगाव- 18 मिमी, पंढरपूर- 8 मिमी, तुंगत- 10 मिमी, चळे- 17 मिमी, पुळुज- 7 मिमी
तालुक्यात एकूण पाऊस 112 मिमी नोंद झाली आहे. पंढरीत आज ढगाळ हवामान असून, काही ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे.