सोलापूर - शेतकरी द्राक्ष बागायतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी किराणा दुकानात आणि मॉलमध्ये वाइन विक्री करण्याचा ( Wine Selling in Super Market ) निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभाग कधीही मद्यपानाला प्रोत्साहन देऊ शकत नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना दिली.
मास्कमुक्तीबाबत आयसीएमआर निर्णय घेईल -
तसेच मार्च मध्यापर्यंत किंवा मार्च अखेरीस कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मास्क मुक्तीबाबत त्यांनी सांगितले की, कोविड महामारी रोखण्यासाठी आयसीएमआरने ( ICMR ) कार्य केले आहे. मास्क मुक्तीबाबत तेच निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.