ETV Bharat / state

'हरित वारी आपुल्याच द्वारी' आषाढी एकादशी निमित्त यावर्षी स्तुत्य उपक्रम - तुषार महाराज भोसले

आषाढी वारीची परंपरा खंडीत न करता मोजक्याच वारकऱ्यांसमवेत फक्त संतांच्या पादुका यावर्षी पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. परंतु, यावर्षी कोरोनाचा प्रभाव असल्याने वारकरी संप्रदायाच्या दिंड्या न काढता या वर्षी वेग-वेगळ्या उपक्रमाने वारी आणि परंपरा जपली जाणार आहे.

Pandharpur Wari
आषाढी वारी
author img

By

Published : Jun 12, 2020, 3:56 PM IST

सोलापूर - आषाढी वारीवर यावर्षी कोरोनाचा प्रभाव असल्याने वारकरी संप्रदायाच्या दिंड्या न काढता या वर्षी वेग-वेगळ्या उपक्रमाने वारी आणि परंपरा जपली जाणार आहे. आषाढी वारीची परंपरा खंडीत न करता मोजक्याच वारकऱ्यांसमवेत फक्त संतांच्या पादुका पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. त्यात आध्यत्मिक गुरु आणि वारकरी संप्रदायाचे वक्ते तुषार महाराज भोसले यांनी पर्यावरणपूरक 'हरित वारी आपुल्याच द्वारी' चा संकल्प सोडला आहे. तसेच सर्व वारकऱ्यांना वृक्ष लागवडीचे आवाहन केले आहे.

आषाढी एकादशी निमित्त यावर्षी स्तुत्य उपक्रम... सर्व वारकऱ्यांना वृक्ष लागवडीचे आवाहन

हेही वाचा... ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या आळंदीत... खबरदारी म्हणून कलम 144 लागू

वारीची वैभवशाली परंपरा खंडीत होऊ नये, अशी अखंड वारकरी संप्रदायाची मनोमन इच्छा आहे. राज्यावरील करोनाचे संकट अधिकच गडद होत आहे. पुणे -सोलापूर जिल्हा रेडझोनमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याबाबत मात्र प्राप्त परिरिस्थितीत सरकारला प्रस्ताव देताना नियम आणि अटींच्या अधीन राहून आषाढी एकादशीपर्यंतचा सोहळा पार पडणार आहे.

आळंदी आणि देहू संस्थांनांनी राज्य सरकारला तशी हमी दिली आहे. त्यामुळे यावर्षी संतांनी आप-आपल्या घरी राहून गावा-गावात आषाढी सोहळा साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे. प्रबोधनाची परंपरा असलेला वारकरी संप्रदाय यानिमित्ताने आता एक नवा अध्याय लिहिणार आहे.

हेही वाचा.. गेल्या 24 तासांत आढळले नवे 10 हजार 956 रुग्ण ; तर 396 जणांचा बळी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.