ETV Bharat / state

दवाखाने सुरू करून रुग्णांना तत्काळ सेवा द्या, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आयएमएला सूचना

सोलापूर शहरातील अनेक खासगी रुग्णालये बंद ठेवण्यात आली आहेत. खासगी डॉक्टर हे इतर रुग्णांवर उपचार करत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिले होते. त्यानंतर काही रुग्णालये सुरू झाली असली तरी प्रत्यक्षात रुग्णांवर उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या.

सोलापूर कोरोना
सोलापूर कोरोना
author img

By

Published : May 29, 2020, 6:53 PM IST

सोलापूर - कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सोलापुरात इतर रुग्णांना उपचार मिळत नाहीत. शहरातील खासगी रुग्णालये बंद ठेवण्यात आली असल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. अशा परिस्थितीमध्ये सोलापुरातील डॉक्टरांनी त्यांची रुग्णालय सुरू ठेऊन त्यातून रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार करावेत, अशा सूचना सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केल्या आहेत. शहरातील सर्व नोंदणीकृत खासगी दवाखाने सुरू ठेवावेत. नागरिकांना रुग्ण सेवा मिळाली पाहिजे. यासाठी खासगी रुग्णालय केवळ सुरू न ठेवता प्रत्यक्ष रुग्णांना सेवा द्या, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या आहेत.

सोलापूर शहरातील अनेक खासगी रुग्णालये बंद ठेवण्यात आली आहेत. खासगी डॉक्टर हे इतर रुग्णांवर उपचार करत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिले होते. त्यानंतर काही रुग्णालये सुरू झाली असली तरी प्रत्यक्षात रुग्णांवर उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील इंडियन मेडिकल असोसिएशनसोबत पालकमंत्र्यांनी आज बैठक घेतली. या बैठकीत संबंधित सूचना केल्या आहेत.

सोलापूर शहरातील खासगी दवाखाने सुरू करण्याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशन आणि प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात बैठक झाली. यावेळी पालकमंत्री भरणे बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस उपायुक्त बापू बांगर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रमुख डॉ. हरीश रायचूर आणि प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे डॉ. सुदीप सारडा यांनी आपले म्हणणे मांडले. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी डॉक्टरांना वारंवार सूचना देऊन दवाखाने सुरू करण्यासंदर्भात सांगितले होते, तरीपण अनेकांनी आपले दवाखाने बंदच ठेवल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भात तक्रारी आल्याचे सांगून पालकमंत्री भरणे म्हणाले की, शहरातील सर्व डॉक्टरांनी कोरोना महामारीच्या कठीण काळात रुग्णांना सेवा द्यावी. सर्व हॉस्पिटल्स सुरू ठेवावेत. शहरातील खासगी दवाखाने सुरू राहिले तर सिविल हॉस्पिटलवरील ताण कमी होईल आणि कोरोनाबाधितांना चांगले उपचार देता येणे शक्य होईल.

यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या समस्या सांगितल्या. या समस्यांवर जिल्हा प्रशासनातर्फे तोडगा काढण्यात येईल. डॉक्टरांना पीपीई किट, मास्क, सुरक्षा साहित्य पुरवठा करण्यात येईल, असे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. डॉक्टरांना सर्व प्रकारचे सहकार्य राहील, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही दवाखान्यात सेवा न मिळाल्यास त्यांनी 1800233 5044 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीस डॉ. नितीन तोष्णीवाल, डॉ. ज्योती चिडगुपकर, डॉ. व्यंकटेश मेतन, डॉ. मिलिंद शहा, डॉ. आदर्श मेहता आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.