ETV Bharat / state

खते, बियाणे बांधावर देण्यासाठी प्रयत्न करा, पालकमंत्र्यांच्या सूचना - Corona virus

पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने खते आणि बियाणांचा पुरवठा वेळेत व्हावा, वीज जोडण्या लवकर मिळाव्यात, शेतीच्या नुकसानीची भरपाई मिळावी, वीज पुरवठा थ्री फेज दाबाने व्हावा, सरकारी आणि खासगी बँकांनी पीक कर्ज पतपुरवठाचे उद्दिष्ट साध्य करावे, अशा मागण्या केल्या.

Guardian Minister Dattatraya Bharane
खते, बियाणे बांधावर देण्यासाठी प्रयत्न करा
author img

By

Published : Apr 30, 2020, 7:24 PM IST

सोलापूर - खते आणि बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज कृषी विभागाला दिल्या. पालकमंत्रींच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामापूर्व आढावा बैठक पार पडली. व्हिडिओ कॅान्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीस जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, जिल्हा उप निबंधक कुंदन भोळे, उपसंचालक रवींद्र माने, नाबार्डचे प्रदिप झिले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक किसन मोटे उपस्थित होते.

बैठकीच्या सुरूवातीला कृषी अधिक्षक बसवराज बिराजदार यांनी खरीप हंगामाचे नियोजन थोडक्यात स्पष्ट केले. पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने खते आणि बियाणांचा पुरवठा वेळेत व्हावा, वीज जोडण्या लवकर मिळाव्यात, शेतीच्या नुकसानीची भरपाई मिळावी, वीज पुरवठा थ्री फेज दाबाने व्हावा, सरकारी आणि खासगी बँकांनी पीक कर्ज पतपुरवठाचे उद्दिष्ट साध्य करावे, अशा मागण्या केल्या. या मागण्यांवर सकारात्मक रीतीने निर्णय घेण्याची कार्यवाही सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी करावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. त्याचबरोबर काही मागण्यांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना खतांच्या किमती कळाव्यात यासाठी त्याची जाहिर प्रसिध्दी करा, बी-बियाणे वेळेत मिळेल याची काळजी घ्या, खते आणि बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर देण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी शेतकरी गटांची मदत घ्या, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.

खरीप हंगामपूर्व बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. यामध्ये उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पीककर्ज वाटप करण्याबाबत बँकांना सूचना कराव्यात अशी सूचना केली. तर आमदार प्रशांत परिचारक यांनी थकित कर्जाचे पुर्नगठण करावे व दूध दराबाबत विचार व्हावा अशी सूचना माडंली. आमदार सुभाष देशमुख यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचे प्रस्ताव निकाली काढण्याची सूचना केली. आमदार बबन शिंदे यांनी मागेल त्याला शेततळे प्रस्ताव मंजूर व्हावा. तर ठिबकचे अनुदान मिळावे, अशी मागणी केली.

करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी अवकाळी पावसाची मदत लवकर मिळावी, अशी मागणी केली. आमदार यशवंत माने यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, असे सांगितले तर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कृषी सोलर पंप पुरवठा करण्यात यावा, अशा सूचना केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.