ETV Bharat / state

घरफोडीच्या चोरीत पोलिसांना नाव सांगितल्याने मित्रानेच काढला मित्राचा काटा - chawdi police

सोबतच सर्व गुन्हे करणाऱ्या दोन मित्रांपैकी एकाचा खून दुसऱ्या मित्राने केल्याची धक्कादायक सोलापूर येथे घडली.

friend killed his friend in solapur
मृत शैलेश कोकाटे
author img

By

Published : Sep 23, 2020, 5:53 AM IST

सोलापूर - घरफोडीच्या चोरीत पोलिसांना नाव सांगितल्याने मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शैलेश कोकाटे असे मृताचे नाव आहे. आरोपी बबलू राजेंद्र नरळे याने स्वत: पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली.

घरफोडीच्या चोरीत पोलिसांना नाव सांगितल्याने मित्रानेच काढला मित्राचा काटा

बबलू राजेंद्र नरळे (वय 30, रा. बल्लाळ चाळ, दमानी नगर) आणि शैलेश गणपत कोकाटे (वय 28, रा. बल्लाळ चाळ, दमानी नगर) हे दोघे जीवलग मित्र होते. दोघांची जोडी आणि दोस्ती प्रत्येक कामात घट्ट होती. दोघांना दारू पिण्याचेही व्यसन होते. दोघे मिळून किरकोळ घरफोड्या देखील करत होते. पोलिसांनी अनेकवेळा दोघांना चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात देखील घेतले होते. अशीच एक 40 हजार रुपयांची घरफोडी लॉकडाऊनपूर्वी झाली होती. पोलिसांनी त्या घरफोडीचा तपास लावत ते शैलेश कोकाटेपर्यंत पोहोचले. शैलेश याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी करत असताना त्याने बबलूचे नाव पोलिसांना सांगितले. या कारणावरून बबलू नरळे हा शैलेश कोकाटेवर चिडून होता.

मंगळवारी अखेर बबलूने त्याचा बदला घेण्याचा प्लॅन केला होता. दुपारी बबलू याने शैलेश याला खूप दारू पाजली. बबलूनेही दारू प्राशन केली होती. मात्र, त्याला जास्त नशा चढली नव्हती. त्याने कमी प्रमाणात दारू प्राशन केली होती. मात्र, शैलेशला भरपूर नशा झाली होती. त्याला मंगळवारी दुपारी दुचाकीवरून शहरातील जुनी मिल कंपाउंड येथील एका पाण्याच्या टाकी खाली घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने शैलेशच्या छातीमध्ये चाकू खुपसले. यावेळी त्याचा जीव जात नव्हता म्हणून रुमालाने गळा आवळला. यानंतर एक मोठा दगडाने डोक्याचा चेंदामेंदा केला. तसेच जीव जाईपर्यंत त्याच्या शरीराकडे पाहत बसला. शैलाशचा मृत्यू झाला ही खात्री झाल्यावर तो फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजर झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.