सोलापूर- जिल्ह्यात बुधवारी 14 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यत सोलापुरात एकूण 470 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 175 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, एकूण 33 जणांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी रात्री साडेआठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 219 अहवाल प्राप्त झाले. यापैकी 205 निगेटिव्ह तर 14 पॉझिटिव्ह आले आहेत. यात 7 पुरूष आणि 7 महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5005 जणांची स्वॅब चाचणी झाली असून 4 हजार 831 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 4 हजार 361 निगेटिव्ह तर 470 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अद्याप 174 अहवाल प्रतिक्षेत आहेत.
जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 33 असून यात 20 पुjरुष, तर 13 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 175 इतकी आहे. तर, 262 जणांवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यात 137 पुरुष तर 125 महिलांचा समावेश आहे.
बुधवारी आढळलेले 14 कोरोना रूग्ण -
भगवान नगर पोलीस मुख्यालय - 2 महिला
साईबाबा चौक - 1 पुरुष, 2 महिला
बापूजीनगर - 1 पुरुष
अशोक चौक - 1 महिला
रामवाडी - 1 पुरुष
दक्षिण सदर बझार - 1 महिला
सलगर वस्ती - 1 पुरुष
कुमठा नाका - 1 पुरुष
भारतरत्न इंदिरा नगर - 2 पुरुष
जुना विडी घरकुल - 1 महिला