ETV Bharat / state

गुन्हे शाखेने शहरातील खासगी सावकारांवरील फास आवळला; 5 जणांना अटक

उद्योजक संतोष श्रीराम यांच्या तक्रारीवरुन सोलापूर शहर पोलिसांनी 5 खासगी सावकारांना अटक केली आहे. न्यायालयाने 5 जणांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खासगी सावकारी वाढल्याचे स्पष्ट झालेय.

Crime branch arrest five money lenders
गुन्हे शाखेकडून 5 सावकारांना अटक
author img

By

Published : Jul 29, 2020, 7:17 AM IST

सोलापूर- शहर गुन्हे शाखेने सोलापूर शहरातील जनतेस खासगी सावकार व्याजासाठी त्रास देत असल्यास गुन्हे शाखेशी संपर्क करावा, असे आवाहन केले होते. एका उद्योजकाने या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर शहर क्राईम ब्रँच गाठली व हकीकत सांगितली. अमोल जगताप आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा खासगी सावकारीचा मुद्दा समोर आला आहे. संतोष श्रीराम या उद्योजकाने सावकार जीवे ठार मारण्याची धमकी देत आहेत. तसेच ज्यादा दराने व्याजाची रक्कम मागत आहेत,अशी तक्रार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यावर ताबडतोब कारवाई करत गुन्हे शाखेने मंगळवारी शहरातील पाच संशयित खासगी सावकारांना अटक केली आहे.

मंगळवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रीनिवास महांकाळी येलदी (वय 52, रा. शास्त्री नगर), कासिम नालबंद ( वय 36, शनिवार पेठ), दिलीप अजमेर गायकवाड (वय 38, रा. सेटलमेंट), किरण माणिक जाधव (वय 33 , रा. लिमयेवाडी), राहूल मारूती सर्वगोड (वय 42, रा. मोदी ) या पाच खासगी सावकारी करणाऱ्या आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले. या सर्व आरोपींना 31 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

संतोष श्रीराम यांनी 2010 साली सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या चिंचोळी एमआयडीसीमध्ये साडे सहा हजार स्क्वेर फूट एवढी जागा घेऊन तेथे पॅकिंग मिनरल वॉटरचा उद्योग उभा केला होता. 2016 पर्यंत श्रीराम यांचा उद्योग ठीक चालला परंतु 2016 नंतर त्यांना सावकारांकडून व्याजाने पैसे घ्यावे लागले. फेब्रुवारी 2017 ते जुलै 2020 या कालावधीत संतोष श्रीराम यांनी एका खासगी सावकाराकडून ज्यादा व्याज दराने व्याजाने रोख रक्कम घेतली.ते कर्ज फेडण्यासाठी पुन्हा एका दुसऱ्या खासगी सावकारांकडून ज्यादा व्याज दराने पैसे घेतले व पहिल्या खासगी सावकाराचे कर्ज फेडले.

दुसऱ्या सावकाराने तगादा लावल्याने संतोष श्रीराम यांनी तिसऱ्या खासगी सावकाराचे दार ठोठावले. त्याकडून ज्यादा व्याज दराने व्याजाने रोख रक्कम घेत दुसऱ्या खासगी सावकरचे कर्ज फेडले.

खासगी सावकारांच्या जाळ्यातून संतोष श्रीराम यांना बाहेर पडताच आले नाही. शेवटी या खासगी सावकरांकडून घेतलेली रक्कम 60 लाख 65 हजार एवढी झाली. त्यामधील 37 लाख 50 हजार 500 एवढि रक्कम परत फेड करून देखील, तिन्ही खासगी सावकार 99 लाख 98 हजार रक्कम मागत होते.

या खासगी सावकारांनी वेळोवेळी संतोष श्रीराम व त्यांच्या पत्नी कडून वेगवेगळ्या कोऱ्या बॉण्ड वर सह्या घेत, कोरे चेक घेतले आहेत. तसेच फिर्यादी श्रीराम यांच्या घरात अनधिकृत रित्या घरात प्रवेश करून त्यांच्या कुटुंबासमोर शिवीगाळ करत, जीवे ठार मारण्याची धमकी देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून संतोष श्रीराम डिसेंबर 2019 पासून घर सोडून निघून गेले होते.

संतोष श्रीराम यांचे मित्र अमोल जगताप यांनी खासगी सावकराना कंटाळून आत्महत्या केली, संपूर्ण कुटुंब संपविले हे माहीत होताच त्यांच्या मयतीला श्रीराम हे उद्योजक आले होते. तेव्हा पासून श्रीराम उमा नागरी मुरारजी पेठ येथील घरीच होते. जगताप कुटुंब आत्महत्या प्रकरणात तपास करताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवाहन केले होते की,खासगी सावकारांनी व्याजासाठी व पैशासाठी त्रास दिले असता, अशा पीडित लोकांनी गुन्हे शाखेशी संपर्क करावे. या आवाहनांनंतर संतोष श्रीराम यांनी गुन्हे शाखेत येऊन रीतसर फिर्याद दिली. यांच्या फिर्यादी वरून गुन्हे शाखेने पाच संशयित खासगी सावकारांना अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तापडिया यांसमोर उभे केले. या पाच ही आरोपींना 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आणखी किती नागरिक या खासगी सावकारांच्या जाळ्यात अडकले आहेत,याचा तपास करणे गरजेचे आहे. शहरात व जिल्ह्यात खासगी सावकारांचा सुळसुळाट वाढला असल्याचे चित्र यावरून स्पष्ट होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.