ETV Bharat / state

आदिनाथ कारखान्याच्या पाच संचालकांचा राजीनामा; रश्मी बागल यांना मोठा धक्का - नारायण पाटील अपक्ष

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील विद्यमान पाच संचालकांनी करमाळा येथे पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी रश्मी बागल आणि त्यांचे भाऊ दिग्विजय बागल यांच्यावर विवीध आरोप केले आहेत.

आदिनाथ कारखान्याच्या पाच संचालकांचा राजीनामा
author img

By

Published : Oct 12, 2019, 12:43 PM IST

सोलापूर - करमाळा विधानसभा मतदारसंघात गटबाजीच्या राजकारणाला सुरुवात झाली असून, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षांसह चार संचालकांनी बागल गटविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. मनमानी व एकाधिकारशाहीला कंटाळून त्यांनी आमदार नारायण पाटील यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याने बागल गटाला धक्का बसला आहे.

आदिनाथ कारखान्याच्या पाच संचालकांचा राजीनामा

हेही वाचा - 'होय...माझ्याकडेही काळा पैसा आहे'

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील विद्यमान उपाध्यक्ष रमेश कांबळे, माजी अध्यक्ष संतोष पाटील, संचालक बापूराव देशमुख, डॉ. हरिदास केवारे, नितीन जगदाळे, या बागल गटाच्या पाच संचालकांनी करमाळा येथे पत्रकार परिषद घेतली. कारखान्यात रश्मी बागल आणि त्याचे भाऊ दिग्विजय बागल यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले, ऊस वाहतूक, तोडणी कामगारांची देणी त्याशिवाय कामगारांचा पगार थकवला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कारखान्यात सुरू असलेल्या मनमानी व एकाधिकारशाहीला कंटाळून आम्ही बागल गटास सोडचिठ्ठी देत असल्याचे सांगत विधानसभा निवडणुकीला अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे करमाळा मतदारसंघाचे राजकीय समिकरणे बदलली आहेत.

हेही वाचा - कोल्हापुरात राजू शेट्टींना मोठा धक्का; स्वाभिमानीच्या काटेंसह तिघांचा भाजपप्रवेश

Intro:Body:करमाळा - आदिनाथच्या पाच संचालकांचे बंड ; बागल गटाला धक्का अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांना पाठिंबा

Anchor - आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील मनमानी व एकाधिकारशाहीला कंटाळून आदिनाथ कारखान्याच्या उपाध्यक्षासह चार संचालकांनी बागल गटविरोधात बंडाचे निशाण फडकावले असून त्यांनी आमदार नारायण पाटील यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे.यामुळे बागल गटाला धक्का बसला आहे.

Vo - आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील विद्यमान उपाध्यक्ष रमेश कांबळे, माजी अध्यक्ष संतोष पाटील,संचालक बापूराव देशमुख, डॉ. हरिदास केवारे,नितीन जगदाळे, या बागल गटाच्या पाच संचालकांनी करमाळा येथे पत्रकार परिषद घेऊन कारखान्यात बागल बहीण भावाने शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले, ऊस वाहतूक, तोडणी कामगारांची देणी त्याशिवाय कामगारांचा पगार थकवला असून कारखान्यात सुरू असलेल्या मनमानी व एकाधिकारशाहीला कंटाळून आम्ही बागल गटास सोडचिठ्ठी देत असल्याचे सांगत विधानसभा निवडणुकीला अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.यामुळे बागल गटाला धक्का बसला आहे.

बाईट -1 - रमेश कांबळे ( उपाध्यक्ष आदिनाथ कारखाना )

बाईट - 2 - नारायण पाटील ( अपक्ष उमेदवार )

करमाळा प्रतिनिधी शितलकुमार मोटेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.