ETV Bharat / state

रक्तदान करून केले मुलीच्या जन्माचे स्वागत; देह-नेत्र दानाचाही केला संकल्प - प्रेम ऊर्फ लाडप्पा सातलगाव

शहराच्या पूर्व भागातील प्रेम ऊर्फ लाडप्पा सातलगाव यांनी आपल्या मुलीच्या जन्माचे स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीने केले आहे. मुलगी झाल्याचा आनंद त्यांनी रक्तदान करून व्यक्त केला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी देहदान आणि नेत्रदानाचा अर्ज देखिल भरुन दिला आहे.

मित्र आणि नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी प्रेम ऊर्फ लाडप्पा सातलगाव यांच्या तर्फे दिलेली प्रतिक्रिया
author img

By

Published : Jun 23, 2019, 7:49 PM IST

सोलापूर - शहराच्या पूर्व भागातील प्रेम ऊर्फ लाडप्पा सातलगाव यांनी आपल्या मुलीच्या जन्माचे स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीने केले आहे. मुलगी झाल्याचा आनंद त्यांनी रक्तदान करून व्यक्त केला आहे. एवढेच नव्हे तर मुलगी झाल्यावर देहदान आणि नेत्रदानाचा अर्ज भरून देईन असा संकल्प त्यांनी केला होता. तो अर्ज भरून त्यांनी महापालिकेत योगीन गुर्जर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

मित्र आणि नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी प्रेम ऊर्फ लाडप्पा सातलगाव यांच्या तर्फे दिलेली प्रतिक्रिया

प्रेम सातलगाव आणि सविता यांना काल (शनिवारी) पहाटे कन्यारत्न झाले. त्यांना एक मुलगा सुध्दा आहे. मुलगी झाली तर मी नक्की रक्तदान करेन आणि मरणोत्तर देहदान आणि नेत्रदानाचा अर्ज भरून देईन, असा संकल्प प्रेम सातलगाव यांनी व्यक्त केला होता. आज त्यांना मुलगी झाली. केलेला संकल्प पुर्ण करण्यासाठी त्यांनी सकाळी रक्तदान केले. त्यानंतर महापालिकेत येऊन योगीन गुर्जर यांच्याकडे देहदान आणि नेत्रदानाचा अर्ज सादर केला.

यावेळी शिवसेनेचे नगरसेवक गुरशांत धुत्तरगावकर, चार्टड अकाऊंट धीरज जवळकर, अल्लाउद्दीन तांबोळी, विजयकुमार निरोळे आदी उपस्थित होते. प्रेम सातलगाव यांनी उचललेल्या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Intro:सोलापूर : शहराच्या पूर्व भागातील प्रेम ऊर्फ लाडप्पा सातलगाव यांनी आपल्या मुलीच्या जन्माचे स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलं आहे.मुलगी झाल्याचा आनंद त्यांनी रक्तदान करून व्यक्त केला आहे.एवढेच नव्हे तर देहदान आणि नेत्रदानाचा केलेला संकल्प देखील पुर्ण करत तसा अर्ज भरून योगीन गुर्जर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
Body:प्रेम सातलगाव आणि सविता यांना आज शनिवारी पहाटे कन्यारत्न झाले.यापुर्वी त्यांना एक मुलगा आहे.मुलगी झाली तर मी नक्की रक्तदान करेन आणि मरणोत्तर देहदान आणि नेत्रदानाचा अर्ज भरून देईन असा संकल्प लाडप्पा यांनी व्यक्त केला होता. मग काय आज झाले तसेच. म्हणून त्यांनी केलेला संकल्प पुर्ण करण्यासाठी सकाळी रक्तदान केले. महापालिकेत येऊन योगीन गुर्जर यांच्याकडे देहदान आणि नेत्रदानाचा अर्ज सादर केला. Conclusion:यावेळी शिवसेनेचे नगरसेवक गुरशांत धुत्तरगावकर,चार्टड अकाऊंट धीरज जवळकर, अल्लाउद्दीन तांबोळी, विजयकुमार निरोळे आदी उपस्थित होते.यावेळी मुलगी झाल्याचा आनंद लाडप्पा यांनी असा आगळ्या वेगळ्या तऱ्हेनं
साजरा केलाय.त्यांचं स्वागत होत आहे.पण त्यांनी माध्यमांशी न बोलता आपले प्रतिनिधी म्हणून त्यांचे मित्र आणि नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांना प्रतिक्रिया द्यायला सांगितलं.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.