सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी शहरांमध्ये बनावट नोटा चालविणाऱ्या महाविद्यालयीन तरुणास (B. Com student arrested for circulating fake notes) सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक (Solapur Fake Note case) केले आहे. त्याच्याकडून अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त (Fake notes worth 2.5 lakhs seized) केल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.महाविद्यालयीन तरुणांना पैशाचे अमिश दाखवून कुर्डवाडीत बनावट नोटांचा धंदा सुरू होता. Latest news from Solapur, Solapur Crime, Fake Note Case
गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अटक : हर्षल शिवाजी लोकरे (वय २०, रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि सुभाष दिगंबर काळे (वय ३६, रा. भोसरी, ता. माढा, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.हर्षल लोकरे हा महाविद्यालयात बीकॉमच शिक्षण घेत असलेला विद्यार्थी आहे. महाविद्यालयीन तरुणांकडून बनावट नोटांचा धंदा सुरू केला होता. कुर्डूवाडी शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयीन तरुण हे पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना एका गुप्तदारामार्फत मिळाली होती. सोलापूर एलसीबीच्या पोलीस पथकाने शनिवारी सायंकाळच्या सुमारास कुर्डूवाडी शहरातील टेंभुर्णी चौकामध्ये सापळा लावला होता. त्यावेळी हर्षल लोकरे हा बनावट नोटा चलनात आणत असताना रंगेहात सापडला. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला.
आणखीण एकास ताब्यात घेऊन चौकशी सुरू : हर्षल लोकरे या महाविद्यालयीन तरुणास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याला या बनावट नोटा सुभाष काळे याने चलनात आणण्यासाठी दिल्या होत्या.पोलीस पथकाने सोलापूर-पुणे महामार्गावरील वरवडे टोल नाक्याजवळ दुचाकी (एम एच ४५ जे ३७०४) वर थांबलेल्या सुभाष काळे यास ताब्यात घेतले. त्यावेळी काळे याच्याकडेही बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी हर्षल लोकरे व सुभाष काळे या दोघांनाही अटक केली. दोघांकडून अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
दोघा संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस तपास सुरू : बनावट नोटा प्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुर्डवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.या बनावट नोटांचे रॅकेट सुभाष काळे हा चालवीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सुभाष काळे हा या बनावट नोटा कुठून आणत होता. या बनावट नोटांची छपाई कोठे होत होती. या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे आणि या रॅकेटच्या माध्यमातून बाजारात किती रुपयांच्या बनावट नोटा आलेल्या आहेत या सर्व बाबींचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असल्याचे समजते.