पंढरपूर (सोलापूर) - राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विठ्ठल मंदिर समितीने मुखदर्शन घेणाऱ्यांची संख्या तीन हजारावरून प्रतिदिन दीड हजार इतकी करण्यात आल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.
हे ही वाचा - सचिन वाझेंनी परस्पर पुरावे लांबवले, पोलीस दप्तरी नाही नोंद
प्रत्येक दिवसाला मिळणार दीड हजार नागरिकांना मुखदर्शन -
24 फेब्रुवारी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विठ्ठल मंदिर समितीकडून कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करून ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करणाऱ्या भाविकांना विठ्ठलाचे मुखदर्शन दिले जात होते. ती संख्या तीन हजार इतकी होती. मात्र 15 मार्च रोजी झालेल्या विठ्ठल मंदिर समितीच्या बैठकीमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ती संख्या दीड हजार इतकी करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने दर्शन पास बुकिंग करून हे मुखदर्शन दिले जाणार आहे. यामुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मुखदर्शनासाठी दीड हजार लोकांना रोज मुखदर्शन घेता येणार आहे.
हे ही वाचा - जामनेरमध्ये कोविडपेक्षा गैरसोई भयंकर, कोविड सेंटरमधून १५ रुग्ण पळाले
विठ्ठल मंदिर समितीची बैठक -
17 मार्च 2020 पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2020 रोजी अटी व शर्ती नुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले झाले होते. मात्र त्यानंतर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता. यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमी विठ्ठल मंदिर समितीच्या अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली व त्यामध्ये तीन हजार भाविकांना ऐवजी दीड हजार भाविकांना मुखदर्शन देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीची बुकिंग बंधनकारक असणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.