ETV Bharat / state

दुष्काळी बैठकः दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील उपाययोजना तातडीने सुरू करा; सहकारमंत्र्यांच्या सूचना

सध्या तालुक्यामधील गावागावातील दुष्काळी परिस्थिती पाहता पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी ज्या गावांना चारा छावण्या उभारावयाच्या असतील तर त्या गावांनी छावणीसाठीचे प्रस्ताव विनाविलंब, विनात्रुटी तत्काळ सादर करावेत. जेणेकरुन जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविणे सोईचे होईल, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले.

आढावा बैठकीत बोलताना सुभाष देशमुख
author img

By

Published : May 27, 2019, 12:37 PM IST

सोलापूर - दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील गावातील जनावरांच्या चारा, पाणी, छावण्या, टँकर मागणी, रोजगार हमीची कामे याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, अधिकारी, ग्रामसेवक यांच्या समवेत दुष्काळी आढावा घेतला. यात त्यांनी उपाययोजनांबाबत चर्चा करुन योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

सध्या तालुक्यामधील गावागावातील दुष्काळी परिस्थिती पाहता पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी ज्या गावांना चारा छावण्या उभारावयाच्या असतील तर त्या गावांनी छावणीसाठीचे प्रस्ताव विनाविलंब, विनात्रुटी तत्काळ सादर करावेत. जेणेकरुन जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविणे सोईचे होईल, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले.

गावातील लोकवस्ती आणि जनावरांसह पिण्याच्या पाण्याचे नियोजन करुन त्याप्रमाणे पाण्याचा साठ्याचा स्त्रोत पाहून विहिरी अधिग्रहण करण्यासाठीचेही प्रस्ताव, विनात्रुटी विनाविलंब सादर करावेत. तसेच गावात पाण्याचा स्रोत्र उपलब्ध नसेल तर त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव सादर करावा. जेणेकरुन सदर टँकर मागणीच्या प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करुन टँकर सुरु करणे सोईचे होईल. तसेच ज्या गावात एमआरईजीएस अंतर्गत कामे प्रस्तावित आहेत. त्या गावातील लोकांना एमआरजीईएस योजनेंतर्गत मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी गावातील कामांचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करुन घेऊन दुष्काळी परिस्थितीतही मजुरांच्या हाती रोजगार उपलब्ध होईल, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

जिल्हा नियोजन भवन, सोलापूर येथे झालेल्या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रांताधिकारी ज्योती पाटील, दक्षिण सोलापूर तहसिलदार रमा जोशी, उत्तर सोलापूर तहसिलदार जयवंत पाटील, दक्षिण सोलापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रशांत सिंह मरोड, उत्तर सोलापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी रंजना कांबळे, जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे श्री. चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदी उपस्थित होते.

R_MH_SOL_27_MAY_2019_MINISTER_DUSHKALI_MEETING_S_PAWAR

दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील दुष्काळी उपाय योजना सुरू करण्याच्या  सहकारमंत्र्यांच्या सूचना 
 सोलापूर-
दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील गावातील जनावरांच्या चारा, पाणी, छावण्या, टँकर मागणी, रोजगार हमीची कामे याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, अधिकारी, ग्रामसेवक यांच्या समवेत दुष्काळी आढावा घेऊन याबाबतच्या उपाययोजनांबाबत चर्चा करुन योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

सध्या तालुक्यामधील गावागावातील दुष्काळी परिस्थिती पहाता पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न सोडविणे गरजेचे आहे, त्यासाठी ज्या गावांना चारा छावण्या उभारावयाच्या असतील तर त्या गावांनी छावणी साठीचे प्रस्ताव विनाविलंब विनात्रुटी तत्काळ सादर करावेत जेणेकरुन जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविणे सोईचे होईल असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले. 
 गावातील लोकवस्ती व जनावरांसह पिण्याच्या पाण्याचे नियोजन करुन त्याप्रमाणे पाण्याचा साठ्याचा स्तोत्र पाहून विहिरी अधिग्रहण करण्यासाठीचेही प्रस्ताव विनात्रुटी विनाविलंब सादर करावेत तसेच गावात पाण्याचा स्तोत्र उपलब्ध नसेल तर त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव सादर करावा जेणेकरुन सदर टँकर मागणीच्या प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करुन टँकर सुरु करणे सोईचे होईल. तसेच ज्या गावात एमआरईजीएस अंतर्गत कामे प्रस्तावित आहेत त्या गावातील लोकांना एमआरजीईएस योजनेंतर्गत मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी गावातील कामांचे प्रस्ताव तात्काळ  मंजूर करुन घेऊन दुष्काळी परिस्थितीतही मजुरांच्या हाती रोजगार उपलब्ध होईल असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.   

जिल्हा नियोजन भवन, सोलापूर येथे झालेल्या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रांताधिकारी ज्योती पाटील, दक्षिण सोलापूर तहसिलदार रमा जोशी, उत्तर सोलापूर तहसिलदार जयवंत पाटील, दक्षिण सोलापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रशांत सिंह मरोड, उत्तर सोलापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी रंजना कांबळे, जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे श्री. चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदी उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.