सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेसाठी मोठी धक्कादायक माहिती समोर आली असून नवीन आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब लावल्याने सोलापूरचे जिल्हा ( District Health Officer of Solapur suspended ) आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्या निलंबणाची घोषणा ( Suspension of Sheetal Kumar Jadhav ) सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केली.नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आरोग्य मंत्री तानाजी सावंत ( Health Minister Tanaji Sawant ) यांनी घोषणा केली आहे.यामुळे सोलापुरातील आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. डॉ शीतलकुमार जाधव हे गेल्या वीस वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात विविध पदावर कार्यरत होते सोलापूर जिल्ह्याबाहेर त्यांची नियुक्ती कधीच झाली नव्हती.
प्रश्नावर उत्तर देताना झाले केले निलंबन - सोलापूर जिल्ह्यातील 22 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 68 उपकेंद्र यांच्या नवीन प्रस्तावाबाबत रणजितसिंह मोहिते-पाटील ( Ranjit Singh Mohite Patil ) यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ सावंत बोलत होते. डॉ.सावंत यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य, उपकेंद्राचा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने नामंजूर झाला आहे. पुन्हा प्रस्ताव सादर करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना बऱ्याचवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, परिपूर्ण प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. राज्यातील नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे. गरजा वाढत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रासाठी पदभरती, मशीनरी, अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल.
वीस वर्षांपासून सोलापुरातच - सोलापूर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. शीतल कुमार जाधव हे गेल्या वीस वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात विविध पदावर तळ ठोकून होते. जिल्ह्या बाहेर त्यांची बदली झाली नव्हती .सोलापूर शहर आरोग्य अधिकारी,कुष्ठरोग सहायक संचालक,जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा क्षयरोग अधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी वरीष्ठ पातळीवर तक्रारी करत त्यांची बदली करा अशी मागणी केली होती.