ETV Bharat / state

सोलापुरात एक दिवस पुरेल इतकाच लसीकरणाचा साठा - news about corona vaccine

सोलापुरात एक दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा उपलब्ध असून या बाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. शहरात आजतागायत 1 लाख 79 हजार नागरिकांचे पहिले लसीकरण करण्यात आले आहे.

सोलापूर
सोलापूर
author img

By

Published : Apr 10, 2021, 5:56 PM IST

सोलापूर - सोलापुरात एक दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल कुमार जाधव यांनी शुक्रवारी सायंकाळी बोलताना दिली. नागरिकांची संख्या वाढल्याने लसीकरणासाठी लस कमी पडत आहेत. राज्य शासनाशी सतत संपर्क करून लसीकरण साठ्याची कमतरता भरून काढली जाणार असून सुरळीत लसीकरणाची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

सोलापुरात 140 लसीकरण केंद्रात लसी अल्प प्रमाणात उपलब्ध

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लसीकरणासाठी 140 आरोग्य केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, येथे दररोज 200 ते 300 नागरिक लसीकरणासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे लसी कमी पडू लागल्या आहेत. राज्य शासनाने 45 वर्षे वयोगटातील नागरिकांनी देखील लसीकरण करून घेण्याचे आवाहन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक दाखल होत आहेत. ऑनलाइन अर्ज करून 200 ते 300 नागरिक दिलेल्या तारखेला हजर होत आहेत. मात्र, लसीकरण केंद्रात फक्त 150 ते 180 लस उपलब्ध आहेत. त्यामुळे लसी कमी पडू लागल्या आहेत. अनेक नागरिक लस न घेताच परत जात आहेत.

आजतागायत 1 लाख 79 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले

कोविड शिल्ड लस उपलब्ध झाल्या पासून आजतागायत 1 लाख 79 हजार 345 नागरिकांना लस देण्यात आली. पहिल्या लसीकरणानंतर दुसरी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. दुसऱ्या डोस मध्ये 28 हजार 811 जणांनी लस घेतली आहे. पहिल्या लसीकरण मोहिमेला आरोग्य कर्मचाऱ्यावर ताण आला नव्हता. मात्र, दुसऱ्या लसीकरण मोहिमेत प्रचंड ताण आरोग्य विभागवार आला आहे.

फक्त 10 हजार डोस शिल्लक आहेत-

लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. लसीचे डोस दररोज संपत आहेत. सद्यस्थितीत सोलापूर शहरासाठी 3560 आणि सोलापूर ग्रामीण भागासाठी 7240 इतकीच लस उपलब्ध आहे. सोलापूर जिल्हा आरोग्य प्रशासनाचे वाहन दर दोन दिवसाला पुणे येथे राज्य औषध भांडारकडे रवाना केले जात आहे. दररोज 10 हजार लसीची गरज पडत आहे. यामुळे शनिवारी या एक दिवसापूरतीच लस सोलापुरात उपलब्ध आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.