ETV Bharat / state

Dhananjay Munde : 'नवनिर्माण आणि नवनीत एकच आहेत हे कळले नाही'; मुंडेची सडकून टीका

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि खासदार नवनीत राणांवर सडकून टीका केली ( Dhananjay Munde Criticizes Mns ) आहे.

dhananjay munde
dhananjay munde
author img

By

Published : Apr 30, 2022, 4:27 PM IST

सोलापूर - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि खासदार नवनीत राणांवर सडकून ( Dhananjay Munde Criticizes Navneet Rana ) टीका केली आहे. हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa Controversy) हे मस्जिद किंवा मातोश्री समोर म्हणायचे नसते. तर, मारुतीच्या मंदिरात म्हणायचे असते. पण, नवनिर्माण आणि नवनीत एकच आहेत. हे आम्हाला आत्ता कळले, असे टीकास्त्र मुंडेंनी सोडले ( Dhananjay Munde Criticizes Mns ) आहे.

मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांनी अनगर येथे शेतकरी कृतज्ञ मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, डबघाईत आलेल्या गोरगरिबांचा विकास कसा साधता येईल यावर विचार सोडून भोंग्यावर राजकारण सुरू केले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी अशा भडकावू राजकारण्यांपासून सावध राहावे. बेरोजगारीचा प्रश्न सुटेना म्हणून जाती पातीचे राजकारण सुरू करून समाजात तेढ निर्माण करण्याचे कार्य केले जात आहे, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

सभेला संबोधित करताना धनंजय मुंडे

हनुमान चालीसा हनुमानासमोर म्हणायची असते - सकाळी कामाची सुरुवात भगवान हनुमान समोर हनुमान चालीसा पठण करून केली जाते. हनुमान चालीसा घरी किंवा मंदिरात म्हणायची असते. मशिदींसमोर किंवा मातोश्री समोर म्हणायची नाही. मस्जिद हनुमान चालीसा म्हणणारे नवनिर्माणवाले आणि मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणारे नवनीत एकच आहेत हे आम्हाला कळलेच नाही, असा निशाणा मनसे आणि राणांवर मुडेंनी साधला आहे.

हेही वाचा - Sharad Pawar Replied To Raj Thackeray : '...म्हणून शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतो', शरद पवारांचे प्रत्युत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.