सोलापूर - शरद पवार सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होतील, असा दावा राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे. शरद पवार हे सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात असले तरी त्याचा कोणताही उपयोग होणार नसल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे. ते सोलापूर येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीला भेटायला जाणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दल बोलताना सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, राज्यातील सत्तास्थापनेसाठी जो तो आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. मात्र, राज्याच्या जनतेनी महायुतीला बहुमत दिलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हा युतीचाच आणि देवेंद्र फडणवीस हेच होणार असल्याचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सोलापूर येथे देशमुख यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
हेही वाचा - करमाळ्यात डेंग्यू सदृश आजाराने विद्यार्थिनीचा मृत्यू
हेही वाचा - पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच - विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर