ETV Bharat / state

येत्या बुधवारपासून दरदिवशी २००० भाविकांना घेता येणार विठ्ठलाचे दर्शन

author img

By

Published : Nov 17, 2020, 6:16 PM IST

पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, दर दिवशी २००० भाविकांना दर्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी दिवसाला केवळ 1 हजार भाविकांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येता होता.

Pandharpur Vitthal Mandir Latest News
दर दिवशी 2000 भाविकांना घेता येणार विठ्ठलाचे दर्शन

पंढरपूर - पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, दर दिवशी दोन हजार भाविकांना दर्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी दिवसाला केवळ 1 हजार भाविकांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येता होता.

शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घालून दिलेल्या नियम व अटींची अंमलबजावणी करून भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज एक हजार भाविकांना मंदिरात प्रवेश मिळत होता. मात्र आता भाविकांची संख्या वाढल्याने दररोज दोन हजार भाविकांना मंंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने सर्व नियमांचे पालन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने काही नियम घालून दिले आहेत. या सर्व नियमांचे पालन करूनच भाविकांना मंदिरात सोडण्यात येत आहे. मंदिरात प्रवेश करताना भाविकांना मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. तसेच सॅनिटाईझ करूनच भाविकांना आत सोडण्यात येते. सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी भाविकांना वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. त्याचबरोबर मंदिर परिसर, दर्शन रांग, नामदेव पायरी यांची कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांना मंदिरात सोडण्यात येते. भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी http://www.vitthalrukminimandir.org/home.html या संकेत स्थळावर भाविकांनी दर्शनासाठी नोंदणी करावी असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • २००० भाविकांना दर्शन, कडक नियमावली
    सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत 2000 भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता येणार
    दर दोन तासांनी 200 भाविकांना दर्शनाकरता सोडण्यात येणार
    दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावे लागणार
    भाविकांनी 24 तास अगोदर ऑनलाईन बुकींग करावे
    मुख दर्शनाकरता आलेल्या भाविकांना कासार घाट येथे पास तपासणी करुन दर्शनाला सोडणार
    मंदिराच्या पूर्व गेटमधून भाविक दर्शनाला आत जातील तर व्हीआयपी गेटमधून बाहेर पडतील
    दर्शन रांगेत दोन भाविकांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक, अन्नक्षेत्र व प्रसाद व्यवस्था बंद राहील
    65 वर्षावरील नागरिक, 10 वर्षाखालील बालक, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांनी दर्शनास न येण्याचे आवाहन

हेही वाचा - करमाळ्यात कमलादेवी मंदिरासमोर भक्तांचा आनंदोत्सव, कोरोनानियमांचे पालन करत घेतले दर्शन

हेही वाचा - मंगळवेढा येथे सौर ऊर्जा प्रकल्पाला आग; कोट्यवधींचे नुकसान

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.