ETV Bharat / state

पंढरपुरात कोरोना योद्धा डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे उपोषण - पंढरपूर कोविड योद्धे डॉक्टर्स उपोषण

पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी पंढरपुरात लाक्षणिक उपोषण केले. कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेमध्ये पुन्हा सामावून घ्यावे, अशी मागणी महामारी योद्धा संघर्ष समितीने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

Pandharpur
Pandharpur
author img

By

Published : Jul 25, 2021, 8:15 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना योद्धे म्हणून काम करणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी पंढरपुरात लाक्षणिक उपोषण केले. राज्य सरकारने 2 जुलैपासून कोरोना काळात काम करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. त्यामुळे कोरोना महामारीत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेमध्ये पुन्हा सामावून घ्यावे, अशा मागणीसाठी महामारी योद्धा संघर्ष समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

महामारी योद्धा संघर्ष समितीच्या अध्यक्षा डॉ. वृषाली पाटील

कोरोना योद्ध्यांच्या मागण्या

पंढरपूर येथील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. शहरातील गजानन महाराज मठ येथील कोरोना केअर सेंटरसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. 'कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये जीवाची परवा न करता कोरोना योद्धे म्हणून कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांना शासनाने कमी करू नये', अशा विविध मागण्या महामारी योद्धा संघर्ष समितीने केल्या आहेत.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

'जिल्हा प्रशासनाकडून कोरोना काळात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना 2 जुलैपासून कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाकडून कोरोना योद्ध्यांना देण्यात आलेले नाही. 3 महिन्यांपासून राज्य शासनाकडून कोरोना योद्ध्यांना कोणत्याही प्रकारचे मानधनही देण्यात आले नाही. तिसऱ्या लाटेमध्ये कोरोना योद्ध्यांचा समावेश करू, अशा प्रकारचे आश्वासन जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे' अशी माहिती महामारी योद्धा संघर्ष समितीच्या अध्यक्षा डॉ. वृषाली पाटील यांनी दिली आहे. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वृषाली यांनी दिला आहे.

हेही वाचा - पूरग्रस्तांना मुख्यमंत्र्यांकडून सर्व मदतीचे आश्वासन; चिपळूणमध्ये साधला पीडितांशी संवाद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.