ETV Bharat / state

पाणी पुरवठ्यावरून सर्वसाधारण सभेत नगरसेवकांचा गोंधळ

सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. लॉकडाऊन नंतर पहिल्यादांच सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेत पाणी प्रश्नावरून नगरसेवकांनी आयुक्तांना धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले.

author img

By

Published : Dec 15, 2020, 5:17 PM IST

solapur water supply news
पाणी पुरवठ्यावरून सर्वसाधारण सभेत नगरसेवकांचा गोंधळ

सोलापूर- सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. लॉकडाऊन नंतर पहिल्यादांच सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेत पाणी प्रश्नावरून नगरसेवकांनी आयुक्तांना धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले.

दिवाळीच्या काळात देखील नागरिकांना आठ- आठ दिवस पाणीपुरवठा करण्यात येत नव्हता, असा आरोप सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला. नगरसेवकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आयुक्त पी. शिवशंकर हे उभे राहिले असता त्यांना काही नगरसेवकांनी खाली बसून उत्तर देण्यासा सांगितले, तर काही नगरसेवकांनी आयुक्तांनी उभे राहून उत्तर द्यावे, अशी भूमिका घेतल्याने सभागृहात गोंधळ उडाला.

दर चार दिवसानंतर पाणीपुरवठा करण्याची मागणी

सोलापूरमध्ये पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. यावर नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. तसेच दर चार दिवसाला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली. त्याचप्रमाणे काही भागांमध्ये रात्री 2-3 च्या सुमारास पाणीपुरवठा केला जातो, त्यामुळे नागरिकांना रात्री जागून पाणी भरावे लागत असल्याचा आरोपही नगरसेवकांकडून करण्यात आला आहे.

'एमआयएम'च्या नगरसेवकाने भर सभेत गायले गीत

दरम्यान या सर्वसाधारण सभेत 'एमआएएम'च्या नगरसेवकाने गाण्याच्या माध्यमातून आपल्या समस्या मांडल्या. दुनिया मे कितने गम है, मेरा गम इतना कम है, असे म्हणत त्यांनी उपासात्मक टिका केली. तसेच शायरीच्या माध्यमातून त्यांना आपल्या समस्या मांडल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.