सोलापूर : शनिवारी सोलापुरात 233 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तसेच दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहर आणि जिल्ह्यातील मिळून एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7 हजार 66 तर मृतांची संख्या 411 झाली आहे. दहा दिवसांचे लॉकडाऊन लागू करूनही रुग्ण वाढतच आहेत. येत्या सोमवारी (27 जुलै) लॉकडाऊन संपणार आहे. पुन्हा अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता हे लॉकडाऊन वाढवले जाईल की याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहेत.
शहर आणि जिल्ह्यात मिळून शनिवारी 396 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजतागायत कोरोनामुक्त रुग्ण संख्या पाहता पहिल्यांदा चारशेच्या आसपास रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सोलापूर शहरातील शनिवारी 1 हजार 147 अहवाल प्राप्त झाले. यामधून 1 हजार 51 निगेटिव्ह तर 96 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. शनिवारी प्राप्त झालेल्या बाधित रुग्णांमध्ये 60 पुरुष व 36 स्त्रियांचा समावेश आहे. शहरात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात 2 रुग्ण तर खासगी रुग्णालयात 2 अशा 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उपचार घेऊन 312 रुग्ण कोरोनामुक्त आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीणमध्ये शनिवारी 137 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 71 पुरुष व 66 स्त्रियांचा समावेश आहे. शनिवारी ग्रामीण भागात एकूण 1 हजार 375 अहवाल प्राप्त झाले. त्यामधून 1 हजार 238 निगेटिव्ह 137 पॉझिटिव्ह निघाले आहे.
ग्रामीण भागात शनिवारी 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 84 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.