ETV Bharat / state

संचारबंदी : घरात रहाल तर, फायद्यात रहाल.. पंतप्रधानांनंतर जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसांचाही इशारा

'ही संचारबंदी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीची नाही. स्वत:सह समाजाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी आहे,' असे शहर पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.

संचारबंदी
संचारबंदी
author img

By

Published : Mar 25, 2020, 10:45 AM IST

Updated : Mar 25, 2020, 12:16 PM IST

सोलापूर - राज्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर प्रमुख शहरांमध्ये नागरिकांची वर्दळ कमी दिसत आहे. मात्र, छोट्या गल्ली-बोळांमध्ये अद्यापही लोकांचा मुक्तसंचार सुरूच आहे. कोणते ना कोणते कारण सांगत हे लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत. 'ही संचारबंदी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीची नाही. स्वत:सह समाजाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी आहे,' असे शहर पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.

संचारबंदी : घरात रहाल तर, फायद्यात रहाल.. पंतप्रधानांनंतर जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसांचाही इशारा

कोरोना प्रतिबंध उपाययोजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी गर्दीची ठिकाणे कमी केली. याबरोबरच सार्वजनिक व खासगी ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येऊ नयेत, यासाठी संचार बंदी लागू केली. त्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आज दिवसभर शहरातून मोटारसायकल आणि अन्य वाहनांची वर्दळ काही केल्या कमी झाली नाही. होटगी रोड, विजापूर रोड, सात रस्ता, टिळक चौक, नवी पेठ, पार्क चौक आदी परिसरांत अनेक वाहने, पादचारी रस्त्यांवर फिरत होते. सोलापूरच्या पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हाभरात संचारबंदी लागू केल्याची माहिती दिली होती. तरीही नागरिक फिरत होते. त्यामुळे काही ठिकाणी पोलिसांना हलक्या बळाचा वापर केला.

या संचारबंदीदरम्यान जीवनावश्यक वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी वेळ निश्चित करण्यात आलीय. तरीही या वेळेत जमावबंदी लागूच असेल. या कालावधीत जीवनावश्यक, आपत्कालीन सेवा चालू राहतील. मात्र अनावश्यक गर्दी करणाऱ्या, सोशल डिस्टसिंग, मास्क न वापरणाऱ्या आणि रस्त्यावर थुंकणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे.

हेही वाचा - साताऱ्यात विलगीकरण केलेल्या व्यक्तीस मॉर्निंग वॉक भोवले; गुन्हा दाखल

हेही वाचा - साताऱ्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी केले १० हजार मास्कचे वाटप

Last Updated : Mar 25, 2020, 12:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.