ETV Bharat / state

बनावट कोरोना तपासणी अहवाल तयार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

पंढरपूर येथील बनावट कोरोना तपासणी अहवाल तयार करणारी वात्सल्य पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सील करण्यात आली आहे. तर अनधिकृत कोविड टेस्टिंग करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल असा इशारा वैद्यकिय अधिक्षक डॉ. गिराम यांनी दिला आहे.

पंढरपूर  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
author img

By

Published : Apr 9, 2021, 1:44 PM IST

पंढरपूर - बनावट कोरोना तपासणी अहवाल तयार करणारी वात्सल्य पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सील करण्यात आली आहे. या प्रकरणात आकाश गोरख आदमिले, उमेश शिंगटे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यापासून बनावट अहवाल तयार करण्याचा काळा बाजार सुरु होता.

आरोग्य विभाग व पोलीसांची संयुक्त कारवाई
कोविड तालुका कृति समितीकडून शहरातील अनधिकृत कोविड टेस्टिंग करुन बनावट रिपोर्ट लॅबद्वारे दिल्या जात आहे. अशी माहिती मिळताच पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. गिराम, तालुका आरोग्यअधिकारी डॉ. एकनाथ बोधले, नायब तहसीलदार कोळी, पोलिस उपनिरीक्षक मगदूम यांच्या पथकाने अचानक लॅबवर छापा टाकला. यावेळी वात्सल्य लॅबचे चालक आदमिले यास अवैधरित्या बनावट रिपोर्ट तयार करताना व रॅपिड अँटिजेंन टेस्ट किट सहित रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याला किट पूरवणारा तसेच बनावट अहवाल तयार करुन देणारा उमेश शिंगटे यालाही पकडले आहे. आदमिले व उमेश शिंगटे आम्ही दोघे हे काम गेल्या 3 महिन्यापासुन करत असल्याची कबुली त्यांनी दिली. याबाबत शहर पोलिस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पॅथॉलॉजी लॅबची दक्षता घ्यावी
यासंबंधी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुह्यात अजुन किती लोकांचा समावेश आहे? याची चौकशी चालू आहे. अशा प्रकारची कोणतीही अनधिकृत कोविड टेस्टिंग आपल्या रुग्णालय अथवा लॅब मध्ये केली जाणार नाही. याची पंढरपुर शहर व तालुक्यातील सर्व डॉक्टर्स आणि पॅथॉथोलॉजी लॅब चालकानी दक्षता घ्यावी, असे आवाहन वैद्यकिय अधीक्षक डॉ. गिराम यानी केले आहे. असे काही आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वैद्यकिय अधीक्षक डॉ. गिराम यांनी दिला आहे.

हेही वाचा - केमोथेरपीमुळे केस गमावलेल्यांसाठी अनोखे 'केश दान'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.