ETV Bharat / state

सोलापुरात मराठा समाजाकडून गिरीश कुबेरांच्या पुतळ्याचे दहन - सोलापुरात गिरीश कुबेरांचा पुतळा जाळला

संभाजी महाराजांबद्दल असे लिखाण आपण खपवून कसे घेता? सरकारने आजपर्यंत पुस्तकावर बंदी का आणली नाही? असा सवाल संभाजीराजे यांनी याअगोदर उपस्थित केला आहे. तसेच पुस्तक लिहिणाऱ्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा देखील संभाजीराजे यांनी दिला आहे.

गिरीश कुबेरांच्या पुतळ्याचे दहन
गिरीश कुबेरांच्या पुतळ्याचे दहन
author img

By

Published : May 28, 2021, 4:43 PM IST

सोलापूर - छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण केल्याचा आरोप करत लेखक गिरीश कुबेर यांच्या पुतळ्याचे सोलापुरात दहन करण्यात आले. गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेले वादग्रस्त लिखाण पुस्तकातून मागे घ्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कुबेरांचा पुतळा जाळून त्यांना सोलापुरात पाय न ठेवू देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच पुण्यात येऊन कुबेरांना काळे फसण्याचा इशाराही यावेळी मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

मराठा समाजाकडून लेखक गिरीश कुबेरांच्या पुतळ्याचे दहन

खासदार संभाजीराजे भोसले यांचाही विरोध

पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातील लेखनावर खासदार संभाजीराजे यांनीही संताप व्यक्त केला आहे. सरकारने तत्काळ या पुस्तकावर देशात आणि राज्यात बंदी घालावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली आहे.

'महाराष्ट्रात फिरू देणार नाही'

संभाजी महाराजांबद्दल असे लिखाण आपण खपवून कसे घेतो? सरकारने आजपर्यंत पुस्तकावर बंदी का आणली नाही? असा सवाल संभाजीराजे यांनी याअगोदर उपस्थित केला आहे. तसेच पुस्तक लिहिणाऱ्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा देखील संभाजीराजे यांनी दिला आहे. बाजारात विक्रीसाठी आलेली सर्व पुस्तके जप्त करावीत आणि शासनाने संवेदनशील विषयात लवकरात लवकर लक्ष घालून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी खासदार संभाजीराजे भोसले यांनी ट्विटव्दारे केली आहे.

काय आहे पुस्तकातील मजकूर?

गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांच्यावर हत्येचा आरोप करुन त्यांची बदनामी केल्याचे विविध संघटना आणि पक्षांचे म्हणणे आहे. यासाठी लेखक कुबेरांनी महाराष्ट्राची माफी मागावी आणि राज्य सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून केली जात आहे.

हेही वाचा-संभाजीराजेंच्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात दोन दिवसाचे अधिवेशन जाहीर करा - चंद्रकांत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.