ETV Bharat / state

Fake Phone Call : दिल्ली-बंगळुरू केके एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची धमकी! एक्सप्रेसची कसून तपासणी

author img

By

Published : Dec 15, 2021, 3:42 AM IST

निनावी कॉलचा गंभीरपणे विचार करत पोलिसांनी के के एक्सप्रेसची तपासणी सुरू केली. धमकी देणाऱ्याने सांगितले होते की, 1500 प्रवाशांना ठार केले जाणार आहे. यावर महाराष्ट्र पोलिसांनी केके एक्सप्रेसची प्रत्येक रेल्वे जंक्शनवर तपासणी सुरू केली. के के एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाल्या पासून प्रत्येक मोठ्या रेल्वे जंक्शनवर बॉम्ब शोधक पथक तत्पर ठेवून चेकिंग करण्यात आली. पण पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, हा एक डेमो आहे.

एक्सप्रेसची कसून तपासणी
एक्सप्रेसची कसून तपासणी

सोलापूर - एका अनोळखी व्यक्तीने दिल्ली-बंगळुरू दरम्यान धावणारी केके एक्सप्रेसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Bomb threat on Delhi-Bangalore KK Express ) दिल्याने पोलीस प्रशासन, आरपीएफ, बॉम्ब शोधक पथक यांची मोठी तारांबळ उडाली. दिल्लीहुन निघालेली केके एक्सप्रेस बंगळुरूत पोहोचणार नाही आणि वाटेतच 1500 प्रवाशी ठार होतील, अशी धमकी मिळाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने आणि बॉम्ब शोधक पथकाने सोलापूर रेल्वे स्थानकात ( Solapur railway station ) केके एक्सप्रेसची कसून तपासणी केली. खास करून बी-1 या डब्याची संपूर्ण तपासणी करण्यात आली. यात एक बॅग संशयितरित्या आढळून आली. बॉम्ब शोधक पथकाने त्या संशयित बॅगची तांत्रिक उपकरणाने शहानिशा केली. पण त्यामध्ये काहीही संशयास्पद आढळले नाही. मात्र यामुळे पोलीस प्रशासन, आरपीएफ प्रशासन आणि बॉम्ब शोधक पथक यांची एकच तारांबळ उडाली. पोलीस उपअधीक्षक प्रवीण चौगुले यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हा एक मॉकड्रिल ( Solapur Police Mockdrill ) होता.

दिल्ली-बंगळुरू केके एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची धमकी!

रेल्वे स्थानकात प्रवाशांत भीतीदायक चित्र -

दिल्लीहुन बंगळुरूकडे जाणारी केके एक्सप्रेस 14 डिसेंबर रोजी मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानकात पोहोचली. केके एक्सप्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावर येण्यापूर्वी सोलापूर शहर पोलिसांची एक तुकडी प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर तैनात होती. तसेच बॉम्ब शोधक पथक देखील दाखल झाले होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहून प्रवाशांत एक प्रकारे भीतीचे चित्र निर्माण झाले होते. दबक्या आवाजात एकमेकांना प्रश्न विचारत होते. पण कोणत्याही प्रवाशाला त्रास न होता, संपूर्ण एक्सप्रेसची तपासणी करण्यात आली.

एक्सप्रेसची कसून तपासणी
एक्सप्रेसची कसून तपासणी

संशयास्पद बॅग आढळली -

बॉम्ब शोधक पथक प्रत्येक बॅगेची तपासणी करत बी-1 डब्यात पोहोचले. त्यावेळी एक बॅग संशयास्पदरित्या आढळली. बॉम्ब शोधक पथकाने ताबडतोब ती बॅग एक्सप्रेस मधून बाहेर काढली आणि त्याची तपासणी सुरू केली. डॉग स्क्वाडला देखील पाचारण करण्यात आले. बॅगेतील सर्व वस्तू हळूहळू बाहेर काढण्यात आल्या. पण त्यामध्ये कपड्याशिवाय काहीही आढळले नाही. सर्व तपासणी झाल्यानंतर केके एक्सप्रेसला सोलापूर रेल्वे स्थानकातून रवाना करण्यात आले.

पाच रेल्वे स्थानकात के के एक्सप्रेसची चेकिंग -

निनावी कॉलचा ( Fake Phone Call ) गंभीरपणे विचार करत पोलिसांनी के के एक्सप्रेसची तपासणी सुरू केली. धमकी देणाऱ्याने सांगितले होते की, 1500 प्रवाशांना ठार केले जाणार आहे. यावर महाराष्ट्र पोलिसांनी केके एक्सप्रेसची प्रत्येक रेल्वे जंक्शनवर तपासणी सुरू केली. के के एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाल्या पासून प्रत्येक मोठ्या रेल्वे जंक्शनवर बॉम्ब शोधक पथक तत्पर ठेवून चेकिंग करण्यात आली. पण पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, हा एक डेमो आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.