सोलापूर- भाजपाने मंदिरे उघडण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर परिसरात भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या तर्फे आंदोलन करण्यात आहे. यावेळी १७ मार्चपासून बंद असलेले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी उघडण्याची मागणी करण्यात आली.
कोरोनाला अटकाव करण्यासाठी धार्मिक स्थळांना बंद करण्यात आले होते. आता मिशन बिगीन अगेनच्या माध्यमातून हळूहळू सर्व व्यवसाय सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे, मदिरांना देखील सुरू करा अशी मागणी होत आहे. अनलॉक ५ घोषित झाला मात्र, यातही राज्यातील मंदिरे सुरू करण्याबाबत कुठलेही निर्देश देण्यात आले नाही. त्यामुळे, नागरिकांमध्ये नाराजी आहे. भाजपने यावर राज्यवापी आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर आज विठ्ठल मंदिर परिसरात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी विठ्ठल मंदिर परिसरातील नामदेव पायरीजवळ आंदोलन करण्याची परवानगी पोलीस प्रशासनाला मागितली होती. याबाबत पोलीस प्रशासनाकडून आंदोलनाची परवानगी नाकरण्यात आली. मात्र, आंदोलन स्थळी भाजपाचे मोजके पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिसांशी वाद घालत वेळ मरून नेण्याचे काम केले. मात्र, विठ्ठल मंदिर येथील महाद्वार भागात काही क्षणाचे आंदोलन करत आंदोलन उरकते घेण्यात आले.
तर मातोश्री बाहेर भजन, किर्तन आंदोलन..
राज्य सरकारने जर येत्या पंधरा दिवसात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर नाही उघडले, तर मुंबई येथील मातोश्रीवरती जाऊन भाजपाच्या वतीने भजन, कीर्तन करू. तसेच, राज्यातील संपूर्ण मंदिर दर्शनासाठी खुले करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेऊ, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांना भाजपा जिल्ह्याध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दिला आहे.
हेही वाचा- मंदिरे उघडा : सोलापुरात भाजपाचे मल्लिकार्जुन मंदिरासमोर 'टाळ मृदंग आंदोलन'